मुंबई: हिंदू धर्मात(hindu religion) कोणत्याही नव्या कामाची सुरूवात शुभ दिव आणि शुभ वेळ पाहून केली जाते. असे मानले जाते की शुभ वेळेस केलेली कामे ही निर्विघ्नपणे सफल होतात. जर तुम्हीही एखाद्या शुभ कार्याच्या सुरूवातीसाठी शुभ वेळ आणि दिवसाची वाट पाहत आहात तर १२ मेचा दिवस खूप खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १२ मेला अनेक शुभ योग बनत आहेत. या दिवशी काही उपाय केल्याने लक्ष्मी मातेची(laxmi mata) कृपा मिळवता येते. Do this upay on 12 may will get money benefit
अधिक वाचा - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पासपोर्ट जप्त
१२ मेच्या दिवशी एकादशीमधील सर्वात श्रेष्ठ मोहिनी एकादशीचे व्रत ठेवले जाईल. यासोबतच अनेक शुभ योग बनत आहेत. ज्योतिषानुसार या दिवशी शुभ हर्षण योग बनत आहे. या दिवशी तीन ग्रह जसे चंद्रमा आपली स्वराशी कन्यामध्ये विराजमान राहतील, शनि कुंभ राशीमध्ये आणि गुरू मीन राशीमध्ये विराजमान राहील. या दिवशी पुजा-पाठ आणि व्रत केल्याने कधीही न संपणारी पुण्य प्राप्ती होईल.
या शुभ योगांमध्ये तुळशीच्या झाडाजळ तुपाचा दिवा लावा आणि ११ वेळा तुळशीभोवती प्रदक्षिणा घाला.
१२ मेला लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस दूध आणि गंगाजलने चंद्राला अर्घ्य द्या. एखाद्या ब्राम्हणाला तुपाचा कलश, दही, सफेद कपडे दान करा.
या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा.
या दिवशी श्रीमदभगवतगीतेचे पठण करा.
लक्ष्मीमातेसह भगवान विष्णू आणि दक्षिणावर्ती शंखाची पुजा करा. पुजेनंतर पिवळी फळे, पिवळे कपडे आणि पिवळे धान्य गरजवंताना द्या.
या दिवशी भगवान विष्णूला शंखानी अभिषेक करा आणि लक्ष्मी मातेला खीरचा प्रसाद द्या. तसेच पुजेमध्ये तुळशीचा पानांचा वापर करा.
अधिक वाचा - Marital Rape: दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशचं नाही सहमत
या दिवशी एकादशीची कथा अवश्य करा. तसेच या दिवशी पुजेच्या वेळेस भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची आरती करा.
Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती केवळ सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे आणि Times Now Marathi याला दुजोरा देत नाही.