Kojagiri pournima 2021: कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी करा यातील एक उपाय, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

आध्यात्म
Updated Oct 18, 2021 | 15:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kojagiri pournima 2021: कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी खास उपाय केल्याने दुप्पट लाभ मिळतात. 

laxmi
कोजागिरी पोर्णिमेला करा उपाय, लक्ष्मी माता होईल प्रसन्न 
थोडं पण कामाचं
  • कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता धरतीवर येते
  • या वर्षी १९ ऑक्टोबला कोजागिरी आहे. 
  • या दिवशी लक्ष्मी मातेचे उपाय केल्याने इच्छित फळ मिळते. 

मुंबई: अश्विन मासातील शुक्ल पक्षातील पोर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी रात्र जागवली जाते. या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो. यावर्षी १९ ऑक्टोबरला कोजागिरी पोर्णिमा आहे. या रात्री लक्ष्मीमाता धरतीवर येते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने नशीब पलटू शकतं. यामुळे आर्थिक तंगी दूर होते. जाणून कोणते आहेत हे उपाय...

  1. जर तुमच्याकडे पैसा टिकत नाही तर कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पुजा करताना तिच्या चरणी पाच आणि सात कवड्या ठेवा. रात्रभर त्या अशाच ठेवा. सकाळी उठून या कवड्या कोणत्यातरी लाल अथवा पिवळ्या रेशमी कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत अथवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. 
  2. कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री चांदण्याची रात्र असते. या दिवशी आकाशातून अमृत खाली येते. त्यामुळे चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवा. चांदीच्या भांड्यात रात्रभर खीर ठेवली जाते. जर घरात कोणी आजारी असेल तर त्याला ही खीर खाऊ घाला. यामुळे ती व्यक्ती रोगमुक्त होते. 
  3. आर्थिक चणचण असेल तर कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला सुपारी अर्पण करा. लाल मौलीने लपेटा. यात अक्षता आणि कुंकू लावा. लक्ष्मी पुजनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे रूपये ठेवण्याच्या जागी ठेवा. यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. 
  1. यश आणि सुख शांतीसाठी कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री हनुमानासमोर चौमुखी दिवा लावा. असे करणे शुभ मानले जाते. यामुळे आजूबाजूच्या नकारात्मक शक्ती संपतात. 
  2. नव्या कामात अथवा व्यापारात यश मिळवण्यासाठी कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची भगवान विष्णूसोबत पुजा करा. एका चौकीमध्ये लाल आसन पसरून ठेवा. यानंतर गंगाजल शिंपडून तुळशीची पाने चढवा. असे केल्याने तुम्हाला यशाचे नवे रस्ते सापडतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी