sankashti chaturthi:आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा हा उपाय, गणपती बाप्पा पूर्ण करतील तुमच्या इच्छा

आध्यात्म
Updated May 19, 2022 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sankashti Chaturthi 2022: हिंदू धर्मात गणपतीच्या पुजेचे विशेष महत्त्व आहे. विघ्नहर्तागणेला प्रिय दूर्वाला खूप महत्त्व आहे. गणपतीची कृपा मिळवण्यासाठी बाप्पाच्या पुजेदरम्यान दूर्वाचा वापर केला जातो. 

ganpati
आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा हा उपाय 
थोडं पण कामाचं
  • गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो
  • दूर्वांशिवाय गणपतीची पुजा अपुरी मानली जाते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार गृहक्लेशातून मु्क्ती मिळवण्यासाठी गायीला दूर्वा खायला घाला.

मुंबई: १९ मे गुरूवारच्या दिवशी ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थीचा(sankashti chaturthi) उपवास केला जात आहे. या दिवशी गणपतीची कृपा मिळवण्यासाठी भक्त पुजा-अर्चा करतात. सोबतच गणपती बाप्पासाठी उपवास करतात. या दिवशी गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची सर्व विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. Do this upay on sankashti chaturthi

अधिक वाचा - ओबीसी आरक्षणावर जूनमध्ये बोलू - अजित पवार

गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो. पुजेमध्ये दूर्वाला विशेष स्थान आहे. दूर्वांशिवाय गणपतीची पुजा अपुरी मानली जाते. सोबतच दूर्वाला मंगल कार्ये जसे गृह प्रवेश, मुंडन तसेच विवाहादरम्यान वापरले जाते. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पुजेदरम्यानही दूर्वांचा वापर केला जातो. या दिवशी दूर्वांचे काही उपाय चमत्कारी सिद्ध होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल...

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा दूर्वांचे हे उपाय

जर तुम्हाला आर्थिक समस्येने ग्रासले असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येकी पाच दूर्वांच्या ११ गाठी करून अर्पण करा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. 

मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दूर्वाला गायीच्या दुधात मिसळून त्याच लेप बनवा आणि तो डोक्यावर टिळा म्हणून लावा. असे केल्याने तुमच्या मनीची इच्छा पूर्ण होईल. 

ज्योतिषशास्त्रानुसार गृहक्लेशातून मु्क्ती मिळवण्यासाठी गायीला दूर्वा खायला घाला. असे केल्याने प्रेम भावना वाढते. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला ११ अथवा १२ दूर्वा अर्पण करा. मात्र या दूर्वांची जुडी असायला हवी हे लक्षात ठेवा. असे केल्याने गणपतीची कृपा मिळते. 

अधिक वाचा - पंचायत वेबसीरिजचा दुसरा सीझन टेलिग्रामवर लीक

गणपतीच्या पुजेत दूर्वांचा वापर केल्याने कुबेरसमान धनप्राप्ती होते. 

बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात दूर्वांच्या ११ जुडी चढवल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी