shani amavasya: शनी अमावस्येला या राशीच्या लोकांनी करा हे उपाय...

आध्यात्म
Updated Aug 26, 2022 | 14:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

शनिवारच्या दिवशी अमावस्येला संयोग होणे दुर्मिळ असते. यावेळेस हा योग २७ ऑगस्टला बनत आहे. अशातच ज्या राशींच्या लोकांवर शनी भारी आहे ते काही उपाय करून हे त्रास दूर करतात. 

shani
शनी अमावस्येला या राशीच्या लोकांनी करा हे उपाय... 
थोडं पण कामाचं
  • शनिश्चरी अमावस्येच्या एक दिवस आधी थोडासा गुळ आणि काळी उडीदाची डाळ एका कपड्यात बांधून झोपताना आपल्या उशाजवळ ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी शनिश्चरी अमावस्येला या पोटलीत बांधलेल्या गोष्टी शनी मंदिरात दान करा. 
  • ज्या राशीच्या व्यक्तींनी शनीची साडेसाती सुरु आहे आणि यामुळे ते खूप त्रस्त आहेत. त्यांनी या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे.

मुंबई: भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला भाद्रपद अमावस्या(amavasya) म्हणतात. या वर्षी शनी अमावस्या शनिवारी म्हणजेच २७ ऑगस्टला येत आहे. अशातच या दिवसाला शनिश्चरी अमावस्या(shani amavsya) असे म्हटले जाते. अमावस्या २६ ऑगस्ट ते दुपारी साधारण १२ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत २७ ऑगस्ट दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. शनीदेव यावेळेस मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. या कारणामुळे धनू, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू आहे. तर मिथुन आणि तूळ राशीचे लोक शनीच्या वक्रीने त्रस्त आहेत. (Do this upay on Shani Amavasya)

अधिक वाचा - Pushpa-2 बाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या नेमकी बातमी

पोटली करा दान

शनिश्चरी अमावस्येच्या एक दिवस आधी थोडासा गुळ आणि काळी उडीदाची डाळ एका कपड्यात बांधून झोपताना आपल्या उशाजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी शनिश्चरी अमावस्येला या पोटलीत बांधलेल्या गोष्टी शनी मंदिरात दान करा. 

मोहरीच्या तेलात पाहा आपले प्रतिबिंब

शनीदेवच्या नकारात्मक दृष्टीपासून बचावासाठी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात नाणे टाका. त्यानंतर या तेलात आपले प्रतिबिंब पाहा. त्यानंतर हे एखाद्या गरजूला दान करा. तसेच संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाने दिवा लावा. 

अधिक वाचा - दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन

मोहरीच्या तेलाचा दिवा

ज्या राशीच्या व्यक्तींनी शनीची साडेसाती सुरु आहे आणि यामुळे ते खूप त्रस्त आहेत. त्यांनी या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. शनीदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळी उडदाची डाळ अर्पण करा आणि यापासून बनवलेला प्रसाद वाटा. 

दान-धर्म महत्त्वाचे

ज्या दिवशी शनी जयंती आहे त्या दिवशी शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी गरीब तसेच गरजूंना मदत करावी. कोणालाही त्रास देऊ नये. तसेच लोकांच्या हितासाठीचे काम करावे. तसेच समाजातल्या गरीब व्यक्तींना दान करावे. त्यांना अन्न, कपडे अशा वस्तू द्याव्यात. 

शनी जयंतीच्या दिवशी 

"ओम शनिश्चराय नमः"
ओम नीलांजन समभसम रविपुत्रम् यमग्रजम्।
छायामार्तंड सम्भूतं तमह नमामि शनेश्चरम् |

या मंत्राचा करावा जप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी