Brahma Muhurta: दिवसभर काम केल्यानंतर रात्री माणसाला गाढ झोप (sleep) लागत असते. ही झोप इतकी गाढ असते की, जवळ मोठा गोंगाट असला तरी आपली झोपमोड होत नाही. परंतु रात्री (night) अशी वेळ आहे ज्या दरम्यान तुमचे डोळे अचानकपणे उघडत असतात. ही वेळ आहे, रात्री 3 ते पाच वाजेदरम्यानची. हा काळ ब्रह्म मुर्हूत असतो. यात तुम्हाला अचानक जाग येऊन डोळे उघडत असतील तर हे काही तरी संकेत आहेत. कारण काळात माणसाला खूप गाढ झोप येत असते. पण तुम्हाला अचानक जाग येत असेल तर याचा काहीतरी अर्थ आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे. (Do you open your eyes between 3 and 5 am while sleeping;these are different signals)
अधिक वाचा :Gram Panchayat Election Results: ग्रामपंचायत निवडणूक निकाल
या काळात जर जाग आल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की, कोणीतरी तुम्हाला झोपेतून उठवलं. पण तुमच्या जवळ कोणी नसतं. बाकी लोक झोपलेले असतात. हे का होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
ब्रह्म मुहूर्त म्हणजे 24 तासाच्या चक्रातील सर्वात शुभ मुर्हूत. या शुभ मुहूर्तावर कोणतेही काम केले जाते त्याचे फळ मिळते. ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे मन सर्वात जास्त सक्रिय असते. यावेळी कोणतेही काम केले तरी यश निश्चितच मिळते. उदाहरणार्थ, या काळात अभ्यास केला तर वाचलेला पाठ हे मेंदू अधिक वेगाने लक्षात ठेवत असतो. हे आपल्या स्मरणात कायम राहत असते. दुसरीकडे, या काळात तुम्ही अध्यात्माकडे वळालात तर तुमची प्रगती निश्चित असते.
अधिक वाचा : Corona is Back :सावधान कोरोना परत येऊ शकतो; सरकार सतर्क
यावेळी केलेले ध्यान तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाते. कारण यावेळी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या दिशेने खूप वेगाने येत असते. या पवित्र शक्ती ब्रह्म मुहूर्त साधनेसाठी पात्र असलेल्या अशा साधकांकडे जात असतात. त्यांना जगाच्या हितासाठी काम करायला लावले जाते. यावेळी शरीरातील सातही चक्रे सक्रिय होतात.
तुमची बहुतेक झोप रात्रीच्या चौथ्या तिमाहीत तीन ते पाच दरम्यान उघडत असेल तर हे तुमच्यासाठी खूप चांगले संकेत आहे. हे संकेत म्हणजे तुम्ही इतर लोकांपेक्षा वेगळे आहात ही जाणीव करून देत असतात. यामुळे या संकेताकडे चुकूनही या वेळेकडे दुर्लक्ष करू नका. या काळात पवित्र ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते. तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून साधना करावी, अशी तिची इच्छा असते. तिला तुमचे मन आणि मेंदू पवित्र प्रकाशाने भरायचे असते. विद्येची देवी सरस्वती यावेळी आपल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांना प्रबोधन करत असते.
टीप : हा मजकूर सामग्री इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य माहिती आणि सामग्रीच्या आधारावर लिहिलेली आहे. टाईम्स नाऊ मराठी याला दुजोरा देत नाही.