Shani Jayanti 2022 : शनि जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान केल्यास होईल लाभ

Donate According to your zodiac sign rashi on shani jayanti 2022 lord dev shani blessing you : शनि जयंतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करावी. सगळे आटपून शनि देवाची मनोभावे पूजा करावी. यानंतर यथाशक्ती गरजूंना दान करावे.

Donate According to your zodiac sign rashi on shani jayanti 2022 lord dev shani blessing you
Shani Jayanti 2022 : शनि जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान केल्यास होईल लाभ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Shani Jayanti 2022 : शनि जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान केल्यास होईल लाभ
 • हिंदू पंचांगानुसार सोमवार ३० मे २०२२ रोजी शनि जयंती
 • शनि जयंतीच्या दिवशी यथाशक्ती गरजूंना दान करावे

Donate According to your zodiac sign rashi on shani jayanti 2022 lord dev shani blessing you : हिंदू पंचांगानुसार सोमवार ३० मे २०२२ रोजी दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या आणि शनि जयंती आहे. शनि जयंतीच्या दिवशी शनि देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. शनि देवाची मनोभावे पूजा केली तर शनि देवाच्या कृपादृष्टीचा लाभ होतो. शनि पीडेचा त्रास कमी होतो. अडचणी दूर होण्यास मदत होते. यामुळे शनि जयंतीला विशेष महत्त्व आहे. शनि देवाला न्यायाची देवता असेही म्हणतात. व्यक्ती किती न्यायाला धरून वागते हे पाहून शनि देव त्या व्यक्तीला किती पीडा द्यावी याचा निर्णय घेतात असे म्हणतात. शनि जयंतीच्या दिवशी शनि देवाची मनोभावे पूजा करण्याने लाभ होतो. शनि साडेसाडी, शनि ढय्या, शनि वक्री झाल्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. 

शनी । शनि

शनि जयंतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करावी. सगळे आटपून शनि देवाची मनोभावे पूजा करावी. यानंतर यथाशक्ती गरजूंना दान करावे. हल्ली गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांच्या स्वरुपातील दान, अंथरुण-पांघरुणाचे दान यांना महत्त्व आले आहे. पण प्रत्येक राशीच्या व्यक्तीने त्याच्या राशीला अनुसरून गरजूंना योग्य ते दान शनि जयंतीच्या दिवशी केल्याने लाभ होतो असे म्हणतात. 

शनि जयंतीच्या दिवशी राशीनुसार करायचे दान

 1. मेष : तीळ दान करावे, मोहरीचे तेल दान करावे
 2. वृषभ : काळे पांघरूण, काळ्या रंगाचे ब्लँकेट, काळ्या रंगाची गोधडी दान करावे
 3. मिथुन : काळ्या रंगाचे वस्त्र अर्थात काळ्या रंगाचे कापड किंवा काळ्या रंगाचे कपडे दान करावे
 4. कर्क : कर्क राशीवर सध्या शनि ढय्या सुरू आहे यामुळे या राशीच्या नागरिकांनी उडदाचे तेल, तेल, तीळ दान करावे
 5. सिंह : सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य हा शनि देवाचा पिता. यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी नीलम दान करावे
 6. कन्या : गरजूंना चप्पल बूट दान करावे
 7. तूळ : गरजूंना काळ्या रंगाचे वस्त्र आणि तेल दान करावे
 8. वृश्चिक : लोखंड किंवा लोखंडाची वस्तू दान करावी
 9. धनु : पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि हळदीचे दान करावे
 10. मकर : सध्या मकर राशीची साडेसाती सुरू आहे यामुळे पशूपक्षी यांना धान्य आणि पाणी द्यावे, गरजूंना अन्न आणि पाणी द्यावे, गोशाळेत सेवा करावी, चांदी किंवा चांदीची वस्तू दान करावी, चांदीची गाय दान करावी
 11. कुंभ : सध्या कुंभ राशीचीही साडेसाती सुरू आहे यामुळे सोनं किंवा सोन्याच्या वस्तू दान कराव्या
 12. मीन : सध्या मीन राशीचीही साडेसाती सुरू आहे यामुळे तीळ दान करावे, मोहरीचे तेल दान करावे

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी