Clothes Astrology: फॅशन म्हणून चुकूनही घालू नका फाटलेले कपडे; येऊ शकते आर्थिक संकट

आध्यात्म
Updated Jun 11, 2022 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Clothes According To Astrology । बदलत्या काळानुसार कपड्याचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. आजकाल लोकांचे फाटलेले कपडे हा फॅशन ट्रेंड झाला आहे. मार्केटमध्ये तुम्ही या ट्रेंडनुसार डेनिम जीन्स टी-शर्ट टॉप पाहिला असेल.

Don't accidentally wear torn clothes as a fashion, There could be a financial crisis
फॅशन म्हणून चुकूनही घालू नका फाटलेले कपडे, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फॅशन म्हणून चुकूनही घालू नका फाटलेले कपडे.
  • ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे वास्तु दोष दर्शवतात.
  • ज्योतिष शास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने व्यक्तीवर शुक्राचा प्रभाव पडतो.

Clothes According To Astrology । मुंबई : बदलत्या काळानुसार कपड्याचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. आजकाल लोकांचे फाटलेले कपडे हा फॅशन ट्रेंड झाला आहे. मार्केटमध्ये तुम्ही या ट्रेंडनुसार डेनिम जीन्स टी-शर्ट टॉप पाहिला असेल. आज जरी हा फॅशनचा ट्रेंड असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे वास्तु दोष दर्शवतात. लक्षणीय म्हणजे असे कपडे घालणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने शरीरातील क्षमता आणि ऊर्जा कमी होते. त्यामुळे व्यक्तीच्या शरीराला अनेक आजारांनी घेरले जाते असे बोलले जाते. चला तर म जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार असे कपडे परिधान केल्याने काय नुकसान होऊ शकते. (Don't accidentally wear torn clothes as a fashion, There could be a financial crisis). 

अधिक वाचा : पाकने वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका

शुक्राचा पडतो प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार फाटलेले कपडे परिधान केल्याने व्यक्तीवर शुक्राचा प्रभाव पडतो. असे कपडे परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख, शांती, समृद्धी, प्रेम निघून जाते. कारण शुक्र ग्रह हा सुख-शांतीचा ग्रह मानला जातो.

गरीबी येते

याशिवाय फाटलेले कपडे परिधान केल्याने घरामध्ये गरिबी येते. असे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे नशीब त्याच्यावर कोपते आणि त्याला खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणूनच चुकूनही असे कपडे घालू नयेत.

नात्यात वाद निर्माण होतात

फाटलेल्या जीन्स आणि इतर कपड्यांचा व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येते आणि नात्यातही भांडणे होतात.

वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो

फाटके कपडे घालणे ही आजची फॅशन झाली आहे पण ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे अशुभ घडवून आणतात. असे कपडे घराच्या आतही ठेवणे अशुभ मानले जाते. घरातही फाटलेले कपडे असतील तर ते लगेच घराबाहेर फेकून द्यावेत.


डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी