Daan Tips: दान करणे हे सनातन धर्मातील (Sanatan Dharma) अत्यंत पुण्यपूर्ण कार्य म्हटले गेले आहे. परंतु विचार न करता दान करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. पंडित पवन कुमार यांच्या मते, दान करणे जेवढे पुण्यपूर्ण आहे, तेवढेच विचार न करता दान करणे हे स्वतःसाठी विनाशकारी ठरू शकते. पुराणातही याची उदाहरणे आहेत. महाभारतात (Mahabharata) कर्णाचे वर्णन महान योद्धा तसेच महान दाता असे केले आहे, परंतु दानशूर वृत्तीमुळे तो स्वतःच्या मृत्यूचे कारणही बनला. यामुळे कोणत्या गोष्टी दान करावे कोणत्या गोष्टी दान करू नये याचा विचार आपण केला पाहिजे. (Don't donate these items by mistake, otherwise there will be bad consequences)
अधिक वाचा : सीमावादावर दिल्लीत पार पडली बैठक, नेमकं काय ठरलं? वाचा
काळी तीळ राहू-केतू आणि शनि यांसारख्या अशुभ ग्रहांशी संबंधित मानले जातात. काळ्या तिळाचे दान केल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही नुकसान होऊ शकते तसेच आर्थिक नुकसानही होऊ शकते.
तुमच्या घरात भांडणं होत असतील तर कदाचित यामागे कारण असू शकते. घरातील माचीस म्हणजे आगपेटी. कारण आपण आगपेटीच्या काड्या कोणाला दान केल्या असतील तर आपल्या घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत असतात. जर तुम्हाला कुटुंबात विनाकारण भांडण नको असेल तर कोणालाही माचीसच्या काड्या दान करू नका. यामुळे तुमच्या कुटुंबातील शांतता बिघडते आणि परस्पर प्रेम कमी होते.
मोहरीचे तेल शनिदेवाशी संबंधित मानले जाते. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करण्याची परंपरा आहे. शनीची साडेसाती दूर करण्यासाठी मोहरीचे तेल दान केले जाते. जर तुम्ही पैसे न देता कोणाकडून मोहरीचे तेल घेतले तर ते तुम्ही शनीच्या प्रकोपाचे शिकार बनवू शकता.
अधिक वाचा : राज्यात अवकाळी पाऊस; कुठे कुठे होणार पाऊस? वाचा...
लोखंडी वस्तू दान केल्याने तुम्ही आर्थिक संकटाला बळी पडू शकता. शारीरिकदृष्ट्याही अस्वस्थ होऊ शकतात. त्यामागील कारण म्हणजे लोखंडात शनिदेवाचा वास असल्याचे सांगितले जाते. जर आपण लोखंडाची वस्तू दान केली तर शनीदेवाला राग येतो. तसेच लोखंडी वस्तू कोणाकडूनही भेट म्हणून घेऊ नयेत.
मीठ दान केल्याने तुम्ही शनीच्या साडेसातीचा बळी होऊ शकता. एवढेच नाही तर मीठ दान केल्याने तुम्ही कर्जबाजारी होऊ शकतात.
दान करणे आणि सुया घेणे दोन्ही हानिकारक आहे. यामुळे घरातील सुख-शांती संपते. देणगीदार आणि प्राप्तकर्ता दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.