Astrology Tips: या गोष्टींचे चुकूनही करू नका दान; येऊ शकते मोठे आर्थिक संकट 

आध्यात्म
Updated Jun 11, 2022 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Donation Benefits । देवी-देवतांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी अनेकदा लोक धार्मिक ग्रंथात लिहलेल्या बाबींचे अनुसरण करत असतात. आपल्या आराध्य देवी-देवतांचा पूजा पाठ करतात.

Don't donate these things by mistake, There could be a big financial crisis
या गोष्टींचे चुकूनही करू नका दान, येऊ शकते मोठे आर्थिक संकट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देवी-देवतांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी अनेकवेळा दान केले जाते.
  • स्टीलचे भांडे कधीच दान करू नये.
  • अपूर्ण माहितीद्वारे पुण्याचे कार्य करणे हे देखील काही वेळा घातक ठरते.

Donation Benefits । मुंबई : देवी-देवतांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी अनेकदा लोक धार्मिक ग्रंथात लिहलेल्या बाबींचे अनुसरण करत असतात. आपल्या आराध्य देवी-देवतांचा पूजा पाठ करतात. व्रत करतात आणि दानधर्म करतात, जेणेकरून देवतांचे आशिर्वाद कायम आपल्या पाठिशी राहावे. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. दान वगैरे केल्याने पितर अर्थात पूर्वज प्रसन्न होतात आणि वंशजावर कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे. (Don't donate these things by mistake, There could be a big financial crisis). 

ज्योतिषशास्त्रामध्ये दानधर्माबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम लक्षात घेऊन दानधर्म केला नाही तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचे दान करण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत या गोष्टींचे दान त्या व्यक्तीला महागात पडू शकते. तसेच घरातील कलह वाढू शकतो. चला तर म जाणून घेऊया कोणत्या गोष्टी दान करू नयेत. 

अधिक वाचा : कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर

 चुकूनही दान करू नका या गोष्टी

  1. स्टीलची भांडी - आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी लोक अनेकदा अशा गोष्टींचे दान करतात, त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार ते चुकूनही करू नये. यापैकी एक स्टीलचे भांडे देखील आहे. असे म्हटले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने व्यक्तीच्या कुटुंबावर खोलवर परिणाम होतो आणि सुख-समृद्धीवर घातक परिणाम होतो. 
  2. शिळी भाकरी - धार्मिक ग्रंथांमध्ये अन्न आणि पाण्याचे महादान असे वर्णन केले आहे. पण यासाठी तुम्ही काहीही दान करू शकत नाही. कोणाच्या तरी पोटात जाईल या विचाराने अनेकवेळा लोक घरी आलेल्या साधूला शिळे अन्न किंवा शिळी भाकरी देतात. पण धार्मिक दृष्टिकोनातून हे अत्यंत चुकीचे आहे. ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते. जर तुम्ही कोणत्याही गरीब किंवा गरजूला अन्न देत असाल तर ते ताजे द्यावे. असे केल्यास तुमचे नशीब आणखी चमकते. 
  3. ग्रथांचे दान - अपूर्ण माहितीद्वारे पुण्याचे कार्य करणे हे देखील काही वेळा घातक ठरते. लक्षणीय बाब म्हणजे गरजूंना पुस्तके, ग्रंथ इत्यादी दान करणे फार शुभ मानले जाते. मात्र दान करताना ते फाटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवा. हेच या दानाचे महत्त्व आहे. दान करताना व्यक्तीचा हेतू स्पष्ट असेल तरच त्याला पुण्य फळ मिळेल. अन्यथा त्या व्यक्तीला गरिबीला सामोरे जावे लागू शकते. घरातील कलह त्याचा आनंद आणि शांती हिरावून घेतो.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी