Budh Gochar: बुध उलटी चाल संपवून वृषभ राशीत झाला मार्गस्थ; या ५ राशींचे चमकणार नशीब

आध्यात्म
Updated Jun 06, 2022 | 10:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Budh Margi Gochar । बुध ग्रहाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते. बुध ग्रहाच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. दरम्यान ३ जूनपासून बुध ग्रहाने वृषभ राशीत संक्रमण केले आहे.

Due to the transition of Mercury to Taurus, the fortunes of these five zodiac signs will shine
बुध उलटी चाल संपवून वृषभ राशीत झाला मार्गस्थ, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • बुध ग्रहाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते.
 • बुध ग्रहाच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो.
 • ३ जूनपासून बुध ग्रहाने वृषभ राशीत संक्रमण केले आहे.

Budh Margi Gochar । मुंबई : बुध ग्रहाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते. बुध ग्रहाच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. दरम्यान ३ जूनपासून बुध ग्रहाने वृषभ राशीत संक्रमण केले आहे. त्यामुळे या काळात तरुणांनी त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण केल्यास ते अधिक उत्साही होतील. महागाईही नियंत्रणात येईल आणि व्यवसायात सुधारणा होईल. चला तर म जाणून घेऊया बुध ग्रहाच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर कसा राहिल. (Due to the transition of Mercury to Taurus, the fortunes of these five zodiac signs will shine). 

अधिक वाचा : शाळा सुरु होण्याबाबत शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

 1. मेष राशी - बुध ग्रहाचे राशीतून दुसऱ्या धन भावात संक्रमण झाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील आनंद वाढेल. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने अगदी विचित्र परिस्थिती हाताळण्यास सक्षम असाल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनुकूल निकालाची अपेक्षा करू शकता. मोठे कर्ज घेण्यापूर्वी नियम आणि अटी वाचण्याची खात्री करा. बाहेरचे लोक तुमच्या यशात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असले तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीने त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
 2. वृषभ राशी - तुमच्या राशीतील बुधाचे संक्रमण तुमच्या व्यवसायाच्या यशावर सकारात्मक परिणाम करेल. परिणामी तुम्ही नवीन करारावर स्वाक्षरी देखील करू शकता. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. आपल्या प्रेमाबद्दल उत्कट असणे महत्वाचे आहे. जर तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा विचार करत असाल तर बुध ग्रहाचे संक्रमण अनुकूल आहे. 
 3. मिथुन राशी - राशीचक्रातील बाराव्या भावात मार्गस्थ झालेला बुध त्याच्या संक्रमणादरम्यान तुम्हाला धावपळ आणि खर्च करण्यास भाग पाडेल. प्रवासातून चांगला फायदा होईल. धर्मादाय ट्रस्ट, अनाथाश्रम आणि धार्मिक ट्रस्टमध्ये सहभागी व्हा. जर तुम्ही परदेशी कंपन्यांमध्ये सेवा करण्यास इच्छुक असाल किंवा दुसर्‍या देशाचे नागरिक बनू इच्छित असाल तर हे ग्रह संक्रमण देखील अनुकूल आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. गुप्त शत्रूपासून स्वत:चे रक्षण करा. वाद आणि न्यायालयीन प्रकरणे यांची आपापसात चर्चा झाली पाहिजे.
 4. कर्क राशी - राशीतून अकराव्या भावात बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि मोठा भाऊ तुम्हाला साथ देईल. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या योजना आणि रणनीती गोपनीय ठेवल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी किंवा व्यवसायासाठी करारावर स्वाक्षरी करण्यास अजिबात कोणताच संकोच करू नका.
 5. सिंह राशी - मार्गस्थ झालेला बुध दहाव्या भावात संक्रमण करत असताना तुम्हाला यश मिळू शकते. या सर्व कामात मदतीचा हात पुढे करूनही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. महिलांसाठी हा योग अधिक लाभदायक ठरेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. मोठ्या कालावधीपासून गुंतवणून ठेवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. चोरीपासून तुमचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रवास करा.
 6. कन्या राशी - राशीच्या नवव्या भावातील बुध ग्रहाचे हे संक्रमण धर्म आणि आध्यात्मात तुमची आवड वाढवेल. तुमच्या शांत नेतृत्वामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे तुम्ही कठीण प्रसंगांना सहजतेने हाताळण्यास सक्षम असाल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांनी आपापसात खासकरून लहान भावांशी वाद घालू नका.
 7. तूळ राशी - राशीच्या आठव्या भावातील बुधाचे संक्रमण अनपेक्षित चढ-उतार आणेल. काही दिवस प्रत्येक निर्णय व काम विचारपूर्वक करावे लागणार आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल. तुमच्या आरोग्याची विशेषत: पोटासंबंधीची परिस्थिती आणि त्वचारोगाची काळजी घ्या. कटकारस्थानांच्या फंदात पडू नका. कामावरचे काम उरकून थेट घरी जा. शक्य असेल तेवढा वाद टाळण्याचा प्रयत्न करा. 
 8. वृश्चिक राशी - राशीच्या सातव्या भावातील बुधाचे संक्रमण तुम्हाला व्यवसायात प्रगती देणारे असेल. तसेच तुम्ही नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचा विचार करत असल्यास, बुध ग्रहाचे संक्रमण फार अनुकूल असेल. वैवाहिक जीवनात गोष्टी चांगल्या होतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांकडून प्रलंबित असलेले काम पूर्ण केले जाणार आहे. तुम्ही अर्ज केल्यास कोणत्याही सरकारी निविदेसाठी तुमची निवड होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वेळेचा लाभ मिळेल.
 9. धनु राशी - राशीच्या सहाव्या शत्रू भावात बुध ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव फारसा सकारात्मक म्हणता येणार नाही. अनेक सुशिक्षित आणि गुप्त शत्रू यांचा सामना करावा लागेल. लोक तुम्हाला अपमानित करण्याची संधी पाहत आहेत. या काळात सर्व वाद आणि न्यायालयीन प्रकरणे सोडवा. आरोग्याबाबत जागरूक राहा. या काळात इतरांना जास्तीचे पैसे देऊ नका. मित्र आणि कुटुंबासाठी कोणतीही वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. परंतु तुमच्याकडे परदेश प्रवासाचा पर्याय देखील आहे.
 10. मकर राशी - राशीच्या पाचव्या शिक्षण भावात मार्गी बुध ग्रहाचे संक्रमण विद्यार्थी आणि या काळात प्रतिष्ठित लोकांसाठी वरदान आहे. या दरम्यान जर कोणतेही मोठे काम आवश्यक असेल किंवा एखाद्याला करारावर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा परिणाम देखील अनुकूल होईल. प्रेमाच्या बाबतीत जवळीकता येईल. प्रेमात लग्न करणे शक्य आहे, परंतु ते योग्य नाही. संतती वाढवण्याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. या काळात घरात पाळणा हलण्याची देखील शक्यता आहे. 
 11. कुंभ राशी - मार्गस्थ झालेल्या बुध ग्रहाचे चौथ्या भावातील संक्रमण अनपेक्षित परिणाम देईल. आपल्या पालकांच्या आरोग्याचा विचार करा. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे वाद मिटतील. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या दृष्टिकोनातूनही तुमच्यासाठी ग्रहाचे संक्रमण अनुकूल राहील. कुटुंब आणि मित्रांकडून सकारात्मक बातम्या मिळण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये प्रलंबित कामे असतील. तुम्ही तुमच्या योजना आणि रणनीती गोपनीय ठेवल्यास तुम्ही अधिक यशस्वी व्हाल.
 12. मीन राशी - बुध ग्रहाचे तिसऱ्या भावात होणारे संक्रमण तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. तुम्ही जे काम निवडाल ते तडीस नेऊनच मोकळा श्वास घ्याल. आपण योग्य निर्णय घेतला आणि कार्य केले तर त्याचे कौतुक होईल. आध्यात्म आणि धर्मात अधिक रुची वाढेल. धार्मिक कार्य आणि दानधर्म यांसारख्या कामात सहभाग वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये नागरिकत्व आणि सेवेसाठी अर्ज करायचा असल्यास ग्रहांचे संक्रमण अनुकूल आहे.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी