dussehra 2022 : लाभदायी व्हावी म्हणून कोणत्या वेळेत आणि कशी करावी दसऱ्याची पूजा?

dussehra 2022 dasara 2022 vijayadashmi 2022 date shubh muhurat shubh muhurta : यंदा दसरा अर्थात विजयादशमी हा सण बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा हा सण दरवर्षी अश्विन शुद्ध दशमी या दिवशी साजरा केला जातो.

dussehra 2022 dasara 2022 vijayadashmi 2022 date shubh muhurat shubh muhurta
dussehra 2022 : कधी करावी दसऱ्याची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • dussehra 2022 : कधी करावी दसऱ्याची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ
  • दसरा म्हणजे काय?
  • विजयादशमी का साजरी करतात?

dussehra 2022 dasara 2022 vijayadashmi 2022 date shubh muhurat shubh muhurta : यंदा दसरा अर्थात विजयादशमी हा सण बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा हा सण दरवर्षी अश्विन शुद्ध दशमी या दिवशी साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर हा सण साजरा होतो.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

इंग्रजी कॅलेंडरनुसार यंदा अश्विन शुद्ध दशमी बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. या दिवशी दसरा अर्थात विजयादशमी हा सण साजरा केला जाईल. 

दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. यामुळे दसऱ्याच्य दिवशी सूर्योदयानंतर दुपारी 12 पर्यंत विधीवत पूजा करून घ्यावी. दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करणे आणि यथाशक्ती दानधर्म करणे शुभ समजले जाते. यामुळे शुभ मुहुर्तावर इच्छुकांनी सोन्याची खरेदी केल्यास ती लाभदायी ठरू शकते.

दशमी तिथी यंदा 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:21 पासून सुरू होईल आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे, 5 ऑक्टोबर रोजी उदया तिथी आहे. यामुळे दसरा बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा होईल.

दसऱ्याची पूजा

सूर्योदयानंतर आंघोळ करून पूजेसाठी सज्ज व्हा. घरातील ज्येष्ठांना पाया पडा. नंतर पूजेची तयारी करा. घराच्या ईशान्य दिशेला पवित्र आणि शुभ स्थान निवडा. ही जागा स्वच्छ करा. तिथे चंदनाच्या लेपाने अष्टदल चक्र तयार करा. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी पूजेचा संकल्प करा. मनोभावे पूजा करा. पूजा झाल्यावर पुन्हा एकदा घरातील ज्येष्ठांना पाया पडा.

दसरा म्हणजे काय? विजयादशमी का साजरी करतात?

विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा आहे. याच दिवसाला दसरा असेही म्हणतात. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करतात. नीतीचा अनितीवरील विजय आणि सत्याचा असत्यावरील विजय साजरा करण्यासाठी दसरा साजरा करतात.

दसऱ्याला विद्येची देवता सरस्वती देवी, अपराजिता देवी, दुर्गा देवी यांची पूजा करतात. योद्ध्यांनी शस्त्र, व्यापाऱ्यांनी चोपडी (हिशेबाच्या वह्या, नोटा मोजण्याचे यंत्र, हिशेबासाठी वापरला जाणारा कॉम्प्युटर), विद्यार्थ्यांनी वह्यापुस्तके, शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे तर कष्टकऱ्यांनी त्यांच्या कामाशी संबंधित साहित्य यांची पूजा दसऱ्याच्या दिवशी करण्याची पद्धत आहे. 

महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करतात. पूर्वी लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची पद्धत होती. अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर परदेशी जाऊन व्यापार करायचे. यातूनच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. शेतकरी दसऱ्याच्या मुहूर्तावर पीक घरात आणतात. आजही काही गावांमध्ये दसऱ्याच्या दिवशी शेतकरी फेट्यात धान्याचा तुरा लावून मिरवतात. समाजातील सर्व वर्गांसाठी दसरा हा दिवस महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. हा दिवस उत्साहाने साजरा करून नंतर पुढील महत्त्वाच्या कामांना सुरुवात करणे लाभदायी समजले जाते. यामुळे आपणही महत्त्वाच्या कामांची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी