Lunar Eclipse 2022: ग्रहण काळात खाणे-पिणे म्हणजे विषाचं सेवन करणं, जाणून घ्या काय आहेत नियम

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 05, 2022 | 12:07 IST

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या दोन्ही काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही अनेक कामे आहेत जी ग्रहण काळात करणे निषिद्ध मानले गेले आहे. यापैकी एक म्हणजे खाणे. या  8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण असतानाही  खाणं किंवा पिणं टाळा

Lunar Eclipse 2022
्रहण काळात खाणे-पिणे म्हणजे विषाचं सेवन करणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण असतानाही खाणं किंवा पिणं टाळा.
  • ग्रहण काळात खाल्लेले अन्न शरीरासाठी हानिकारक असते.
  • चंद्रग्रहणात चंद्राची किरणे विषारी मानली जातात.

Prohibited Eat Food During Lunar Eclipse 2022: या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) मंगळवार, 08 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतातही (India) पाहता येणार असल्याने त्याचा सुतक काळही भारतात वैध असेल. ग्रहणाविषयी अनेक समजुती आपल्या समाजात आहेत. शास्त्रानुसार अनेक नियम या ग्रहण काळात असतात. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या दोन्ही काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही अनेक कामे आहेत जी ग्रहण काळात करणे निषिद्ध मानले गेले आहे. यापैकी एक म्हणजे खाणे. या  8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण असतानाही  खाणं किंवा पिणं टाळा. कारण ग्रहणकाळात खाल्लेले अन्न विषासारखे मानले जाते. ग्रहण काळात खाल्लेले अन्न शरीरासाठी  हानिकारक असते. जाणून घ्या ग्रहण काळात खाणे पिणे का वर्ज्य असते. (Eating and drinking during eclipse means consuming poison, know the rules)

अधिक वाचा  : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन

ग्रहणात खाल्लेले अन्न असते विषासारखे 

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, चंद्रग्रहणात चंद्राची किरणे विषारी मानली जातात. त्यातून निघणारे अतिनील किरणं सर्व अन्न आणि पाणी दूषित करतात.  मात्र, या किरणांचा प्रभाव फक्त शिजवलेल्या अन्नावरच होतो. ग्रहण संपल्यानंतर तुम्ही न शिजवलेल्या गोष्टी जसे की धान्य, फळे आणि भाज्यांचे सेवन करू शकता.

ग्रहण काळात खाल्लेले अन्न तुम्हाला आजारी बनवू शकते 

शास्त्रानुसार, ग्रहण काळात अन्न दूषित होते आणि असे अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी देखील पडू शकता.  कारण त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे ग्रहणकाळात अन्नपदार्थांवर तुळशीची पाने ठेवतात. तुळशी पाने अन्नपदार्थावर ठेवली जातात हा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु  कारण ग्रहणकाळात तुळशीमध्ये असलेल्या पारापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा खाण्या-पिण्यावर परिणाम होत नाही. 

अधिक वाचा  :पुरुषांच्या या तीन सवय पाहून महिला होत असतात घायाळ

साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी सामील होण्यापूर्वी घरी दूध, दही आणि शिजवलेले अन्न असल्यास काय करावे.  ते फेकून द्यावे का? असा सहज सोपा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर ग्रहणाच्या आधी शिजवलेले अन्न ग्रहणानंतर टाकून द्यावे. पण काही गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. ग्रहणाच्या आधी शिजवलेले अन्न ग्रहणानंतर टाकून द्यावे. पण काही गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. ग्रहणाच्या आधी शिजवलेल्या अन्नात किंवा धान्यात कुश टाका. त्यामुळे तुम्ही ते नंतर वापरू शकता. त्यामुळे पदार्थ प्रदूषित होत नाही. जर तुमच्याकडे कुशा नसेल तर तुम्ही तीळ देखील वापरू शकता. त्याचबरोबर काही लोक ग्रहण लागण्यापूर्वी अन्नपदार्थांवर तुळशीची पाने टाकतात.

या लोकांना आहे सूट 

अशा प्रकारे ग्रहण काळात खाणेपिणे वर्ज्य आहे. परंतु गरोदर स्त्रिया, अगदी लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी कोणतीही मनाई नाही.  ते ग्रहण काळात हलके अन्न खाऊ शकतात आणि पाणी पिऊ शकतात. 

(डिस्क्लेमर : हा लेख  इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामग्रीवर आधारित लिहिले गेले आहे. टाईम्स नाऊ नवभारत याला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी