मुंबई : श्री एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. यंदा नाथ षष्ठीला मोठ्या संख्येने भाविक राहण्याची शक्यता आहे. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपूरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या 475दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.
संत एकनाथांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला होता. नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी! नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृसुख नव्हते, वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले
अधिक वाचा : प्राजूनं तोडलं मराठी अभिनेत्यांचं दिल!
एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले.
अधिक वाचा : कलरफुल प्राजक्ता माळीची दिलखूश अदा
नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटले जाते, त्या ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे 250 वर्षानंतर नाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांची विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली.
फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते. ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.
अधिक वाचा : पांड्या वहिनींचा हॉट बीच लूक पाहून फुटेल घाम
नाथषष्ठीला पैठण येथे यात्रा भरते. काल्याचे किर्तन केले जाते. अनेक ठिकाणा वरून दिंड्या आलेल्या असतात. नाथांच्या पादूकांची पालखी काढली जाते. पादूकांना गोदास्नान घालण्यात येते. मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात.