Ekvira Mata Devi aarti : एक जागृत देवस्थान म्हणून आई एकवीरेची ख्याती आहे. चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या देवीचं महत्व जितकं मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण भागातील कोळी, आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातील इतरही समाजात आहे. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडूनही पूजा केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या काही लोकांचीही कुलदेवता आहे.
आई एकविरा मातेची कहाणी स्कंद्पुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण यांमधून सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात. एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिध्द आहे. जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबध येतो. कोळी, आगरी या लोकांचा व्यावसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबधीत आहे. त्यामूळेच या समाजाने आई एकविरेला कुलदैवत मानलं आहे. या देवीची आपण आरती जाणून घेणार आहोत..
आरती एकवीरा | देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी|
देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.||
कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ ||
चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ ||
दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ ||
हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ ||
तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ||
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ ||
शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ||
अधिक वाचा :कोणत्या राशींवर महादेवाची राहील कृपा; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥
अधिक वाचा :जाणून घ्या चैत्र नवरात्री व्रताचे नियम, नाहीतर होईल नुकसान