Devshayani Ekadashi 2022 Puja Vidhi, Muhurat: जाणून घ्या आषाढी एकादशीची तिथी, मुहूर्त, पूजा आणि महत्त्व

Devshayani Ekadashi 2022 Puja Vidhi, Muhurat, Mantra in Marathi: हिंदू पंचागानुसार, देवशयनी एकादशीचे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते.

fast of devshayani ekadashi know its date muhurta worship method and importance ashadi ekadashi pandharpur
जाणून घ्या आषाढी एकादशीची तिथी, मुहूर्त, पूजा आणि महत्त्व (@PandharpurVR)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
 • देवशयनी एकादशीला भगवान विष्णूची, पांडुरंगाची पूजा केली जाते
 • असं म्हटलं जातं की, या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने अधोलोकातील योगनिद्रामध्ये वास्तव्य करतात.
 • जाणून घ्या देवशयनी आषाढी एकादशीची तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Devshayani Ekadashi 2022 Puja Vidhi, Muhurat, Mantra: देवशयनी आषाढी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्व एकादशींमध्ये ही सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. पंचांगानुसार हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवसापासून भगवान श्री हरी 4 महिने योग निद्रामध्ये जातात आणि नंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला स्वर्गात येतात.

हिंदू धर्मात मंगल कार्यासाठी हे 4 महिने शुभ मानले जात नाही. लग्नासारखे शुभ कार्य या महिन्यात होत नाही. देवशयनी एकादशीला हरिष्यनी एकादशी असेही म्हणतात. हे व्रत भक्तीभावाने केल्यास मोक्ष आणि पापांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते. जर तुम्हीही देवशयनी एकादशी व्रत ठेवण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तिची तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या.

देवशयनी आषाढी एकादशी 2022 तारीख

पंचांगानुसार देवशयनी एकादशीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच ठेवले जाते. यावेळी देवशयनी आषाढी एकादशीचे 10 जुलै रोजी आहे. 

अधिक वाचा: Guru Purnima 2022: गुरूपौर्णिमा कधी आहे? येथे पाहा योग्य तारीख, पूजेची पद्धत, शुभ वेळ आणि महत्त्व

देवशयनी आषाढी एकादशी 2022 मुहूर्त

 1. देवशयनी आषाढी एकादशी तिथी प्रारंभ: 09 जुलै 2022, संध्याकाळी 04:39 पासून
 2. देवशयनी आषाढी एकादशीची तिथी समाप्त: 10 जुलै 2022, दुपारी 02:13 पर्यंत
 3. देवशयनी आषाढी एकादशी 2022 उपासना पद्धत
 4. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम ब्राह्म मुहूर्तावर उठून दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
 5. आता भगवान विष्णूचे स्मरण करून त्यांच्या मंत्रांचा जप करा.
 6. देवशयनी आषाढी एकादशीला फक्त पिवळे कपडे परिधान करा. पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे.
 7. आता एका जागी पिवळे कापड ठेवून आणि भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.
 8. भगवान विष्णूला फुले, फळे, तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करा.
 9. भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचा प्रसाद अर्पण करा.
 10. पूजा केल्यानंतर कथा वाचून भगवान विष्णूची आरती करावी.
 11. दिवसभर उपवास ठेवा.
 12. संध्याकाळी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करा.
 13. दुसऱ्या दिवशी दैनंदिन कामे आटोपल्यानंतर श्री विष्णूची पूजा करून पारायण करा.

अधिक वाचा: Devshayani Ekadashi 2022: देवशयनी एकादशी पासून ४ महिने का झोपी जातात भगवान विष्णू; जाणून घ्या त्याचे महत्त्व

देवशयनी आषाढी एकादशी 2022 महत्व

हिंदू धर्मानुसार, देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने अधोलोकात योगनिद्रावर जातात. हे चार महिने संचालन भगवान शिव करतात. अशी अख्यायिका आहे.  हिंदू धर्मात लग्न, मुंज यासारखे कोणतेही शुभ कार्य या 4 महिन्यात होत नाही. या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूची आराधना केल्याने इच्छित परिणामांची प्राप्ती आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी