Hartalika 2022: कशी करतात हरतालिकेची पूजा?; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, कहाणी आणि महत्त्व

Hartalika 2022: हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल असा उपवास करतात. यंदा हरतालिका 30 ऑगस्टला आहे.

Hartalika 2022
हरतालिकेची पूजा कशी करावी?, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त  
थोडं पण कामाचं
  • भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो.
  • यादिवशी विशेष भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
  • हा उपवास करणाऱ्या अविवाहित मुलींना इच्छित असा वर मिळतो.


मुंबई:  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो.  असं म्हणतात की, शास्त्रात म्हटलं आहे की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल असा उपवास करतात. यंदा हरतालिका 30 ऑगस्टला आहे.

हरतालिकेचं महत्त्व 

यादिवशी विशेष भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं. हा उपवास करणाऱ्या अविवाहित मुलींना इच्छित असा वर मिळतो. हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे एकत्रीकरण झाले होते असे म्हणतात. पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. हे पाहून भोळे भंडारी यांनी त्यांना दर्शन दिले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून हरतालिकेचा उपवास ठेवण्याची परंपरा सुरू झाली आहे. 

हरतालिका पूजा पद्धत

सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हरतालिकेची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी वाळू, रेती किंवा काळ्या मातीच्या मूर्ती बनवून भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांची पूजा करण्यात येते. ज्या जागी तुम्ही पूजा करणार आहात ते स्थळ फुलांनी सजवावं आणि चौरंग ठेवा. त्यावर केळीची पाने पसरवा आणि भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेशाची मूर्ती स्थापित करा.
 

अधिक वाचा- कोट्यवधी व्हायचं आहे, मग करा 'हे' काम; व्हाल मालामाल

यानंतर शिव, पार्वती आणि गणेशाची षोडशोपचार पद्धतीनं पूजा करावी. त्यावेळी माता पार्वतीसमोर मधाच्या सर्व वस्तू अर्पण करा. त्यानंतर भगवान शंकराला धोतर आणि शॉल अर्पण करा. ज्या गोष्टी अर्पण करणार आहात या सर्व वस्तू शेवटी एका गरीब ब्राह्मणाला दान करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीनंतर देवी पार्वतीला सिंदूर अर्पण करा, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडा.

हरतालिका शुभ मुहूर्त

हरतालिकेचे व्रत 30 ऑगस्ट 2022 रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी सूर्योदयासह उपवासाचा संकल्प केला जाणार आहे. यावेळी पूजेसाठी सुमारे दोन तासांचा शुभ मुहूर्त आहे. हरतालिकेच्या दिवशी सकाळी 6.30 ते 8.33 पर्यंत पूजा करता येईल. तर प्रदोष पूजा संध्याकाळी 6.33 ते रात्री 8.51 पर्यंत करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी