February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

February 2023 Calendar, Hindu Festivals List : जाणून घ्या फेब्रुवारी 2023 या महिन्यात कोणकोणते व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस कधी आहेत. 

February 2023 Calendar, Hindu Festivals List
फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • February 2023 : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
  • महत्त्वाच्या दिवसांची माहिती मिळविण्यासाठी गूगल सर्च सुरू
  • टाइम्स नाउ मराठी घेऊन आले आहे फेब्रुवारी 2023 या महिन्याचे कॅलेंडर

February 2023 Marathi Calendar, Hindu Festivals List : बुधवारपासून नव्या महिन्याची अर्थात फेब्रुवारी 2023 ची सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिना हा 2023 या वर्षातील दुसरा महिना आहे. या महिन्याच्या सुरुवातीला देशाचे बजेट सादर होईल. यामुळे फेब्रुवारीला महिन्याचे महत्त्व वाढले आहे. पण फेब्रुवारी महिन्याचे एवढेच महत्त्व नाही तर फेब्रुवारी महिन्यात अनेक व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस आहेत. जाणून घ्या फेब्रुवारी 2023 या महिन्यात कोणकोणते व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस कधी आहेत. 

अनेकांनी जानेवारी 2023 संपण्याआधीच फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस, सुट्यांचे दिवस जाणून घेण्यासाठी गूगल सर्च सुरू आहे. या सर्चचा आढावा घेऊन टाइम्स नाउ मराठी आपल्यासाठी घेऊन आले आहे फेब्रुवारी 2023 या महिन्याचे कॅलेंडर. या कॅलेंडरमध्ये व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस यांच्याबाबतची सविस्तर माहिती आहे.

Egg : अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका

Tips For Belly Fat Loss : पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ

फेब्रुवारी 2023 मधील महत्त्वाचे दिवस

तारीख दिवस सण

01 फेब्रुवारी 2023

बुधवार जया एकादशी आणि रावजी महाराज एकादशी - खानापूर, रावेर
02 फेब्रुवारी 2023 गुरुवार

भीष्माद्वादशी

03 फेब्रुवारी 2023 शुक्रवार प्रदोष, विश्वकर्मा जयंती, बालाजी देवस्थान घोडायात्रा चिमूर चंद्रपूर
05 फेब्रुवारी 2023 रविवार माघ पौर्णिमा, माघस्नान समाप्ती, गोव्याच्या मंगेशीची रथयात्रा, गुरु रविदास जयंती, चित्रऋषी यात्रा ताटसावळी वर्धा, हजरत अली जन्मदिन, अवलिया महाराज यात्रा, संत रोहिदास जयंती
06 फेब्रुवारी 2023 सोमवार गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, खंडोबा महाराज यात्रा सिन्नर, विष्णुबुवा जोग महाराद पुण्यतिथी,आळंदी देवाची
07 फेब्रुवारी 2023 मंगळवार तुळसामाता पुण्यतिथी घाटलाडकी अचलपूर
08 फेब्रुवारी 2023 बुधवार संत नरहरी सोनार पुण्यतिथी
09 फेब्रुवारी 2023 गुरुवार संकष्ट चतुर्थी, गोदड महाराज पुण्यतिथी
11 फेब्रुवारी 2023 शनिवार

बिरबलनाथ यात्रा

12 फेब्रुवारी 2023 रविवार ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी, आवजीसिद्ध महाराज महोत्सव, पारशी मेहेर मासारंभ
13 फेब्रुवारी 2023 सोमवार कालाष्टमी, गजानन महाराज प्रकटदिन
14 फेब्रुवारी 2023 मंगळवार आनंदस्वामी पुण्यतिथी, ब्रजभूषण महाराज पुण्यतिथी, भानुदास महाराज जयंती, 
15 फेब्रुवारी 2023 बुधवार रामदास नवमी, संत सेवालाल महाराज जयंती, वामन महाराज जन्मोत्सव 
16 फेब्रुवारी 2023 गुरुवार विजया स्मार्त एकादशी
17 फेब्रुवारी 2023 शुक्रवार भागवत एकादशी, वासुदेव बळवंत फडके पुण्यतथी, क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथी, रामानंद जालनेकर महाराज जयंती
18 फेब्रुवारी 2023 शनिवार महाशिवरात्री, शिवपूजन, शनिप्रदोष, महाशिवरात्री यात्रा, शिवगजानन यात्रा
19 फेब्रुवारी 2023 रविवार गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी, दर्श अमावस्या, शब्बे मिराज, छत्रपती शिवाजी महाराज जयंती
20 फेब्रुवारी 2023 सोमवार माघ अमावस्या, प्रल्हाद महाराज रामदासी जयंती, नाथयात्रा
21 फेब्रुवारी 2023 मंगळवार रामकृष्ण जयंती, दादाजी महाराज साल्पेकर पुण्यतिथी, निळोबाराय यात्रा
22 फेब्रुवारी 2023 बुधवार मुस्लिम शाबान मासारंभ, अप्पा महाराज पुण्यतिथी
23 फेब्रुवारी 2023 गुरुवार विनायक चतुर्थी, संत गाडगेबाबा जयंती
24 फेब्रुवारी 2023 शुक्रवार वर्ल्ड प्रिंटिंग डे
26 फेब्रुवारी 2023 रविवार स्वा. सावरकर पुण्यतिथी, सदाशिव महाराज अयाचित पुण्यतिथी, मुंगासाजी महाराज पुण्यतिथी
27 फेब्रुवारी 2023 सोमवार दुर्गाष्टमी, मराठी भाषा दिवस
28 फेब्रुवारी मंगळवार राष्ट्रीय विज्ञान दिवस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी