Astrology: तुमच्याही पत्नीला येतो सतत राग? जाणून घ्या कोणत्या महिन्यात जन्मलेल्या महिलांचा स्वभाव असतो खूप रागीट

आध्यात्म
Updated May 02, 2022 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology News In Marathi | धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की आजतागायत खुद्द देवही स्त्रियांचे स्वभाव ओळखू शकले नाहीत तर मानवाला आणि महापुरूषांना कसे कळणार?

 Find out the nature of women born in every month 
या महिन्यात जन्मलेल्या महिलांचा स्वभाव असतो खूप रागीट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की देवही स्त्रियांचे स्वभाव ओळखू शकले नाहीत.
  • मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेल्या महिला गोड बोलण्यात खूप माहीर असतात.
  • मे आणि जून महिन्यात महिन्यात जन्मलेल्या महिला स्वभावाने अतिशय रागीट असतात.

Astrology News In Marathi | नवी दिल्ली : धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की आजतागायत खुद्द देवही स्त्रियांचे स्वभाव ओळखू शकले नाहीत तर मानवाला आणि महापुरूषांना ते कसे कळणार? आजच्या काळात मुले मुलींना समजून घेण्याच्या नादात वर्षोनुवर्षे लग्नाच्या भानगडीत पडत नाहीत आणि आयुष्यभर त्यांना समजून घेत राहतात. (Find out the nature of women born in every month). 

अधिक वाचा : आज आणि उद्या या शहरात बंद राहणार बॅंका

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्माला आलेल्या स्त्रिया

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या स्त्रिया पाहायला अतिशय आकर्षक असतात. त्या प्रामुख्याने गोऱ्या रंगाच्या असतात. त्यांचे डोळे आणि स्माइल अतिशय मोहक आहे. अशा स्त्रिया स्वभावाने आनंदी आणि सद्गुणांनी परिपूर्ण असतात. त्यांचा स्वभाव शांत आणि उदार असतो तसेच त्यांना विश्रांती घेणे खूप आवडते, ज्यामुळे ते कधीकधी आळशीपणाच्या वृत्तीकडे वळून कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद आहेत आणि ते आपल्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. अशा स्त्रियांना पाहुण्यांचा सत्कार करणे चांगले जमते, ज्यामुळे लोक त्यांना भेटण्यासाठी अतुर असतात. अशा महिलांच्या मागे लोक त्यांची स्तुती करतात.

मार्च आणि एप्रिल 

मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेल्या महिला गोड बोलण्यात खूप माहीर असतात. सुसंस्कृत आणि व्यवहारी वृत्तीच्या असतात. अशा स्त्रिया मनाने पूर्णपणे स्वच्छ असतात, त्या त्यांच्या मनात काहीच गुपित ठेवत नाहीत. त्यांच्या मनात जे काही असते ते त्या उघडपणे सांगतात. अशा स्त्रिया खूप श्रीमंत असतात तसेच त्यांना पुत्रलाभ देखील होतो. लक्षणीय बाब म्हणजे त्यांचा देवावर विश्वास मोठ्या प्रमाणात असतो तसेच त्यांना धर्म आणि कर्म यात जास्त ज्ञान असते. या स्त्रिया अतिशय सुंदर रंगाच्या असून त्यांच्या वागण्यामुळे ते लवकर इतरांमध्ये मिसळून जातात. अशा महिला प्रत्येक क्षेत्रात कलात्मक असतात आणि त्यांचा स्वभाव जिद्दी असतो. जर त्यांच्यासोबत काही वाईट घडले तर ते ती गोष्ट मनावर घेतात, त्यामुळे लोकांसोबतचे त्यांचे वागणे लवकर बिघडते. परंतु त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या ज्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासून देत नाहीत. 

अधिक वाचा : राज ठाकरेंच्या अल्टीमेटवर मुस्लिम समाज शांत राहणार - जलील

मे आणि जून 

मे आणि जून महिन्यात महिन्यात जन्मलेल्या महिला स्वभावाने अतिशय रागीट असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांचा राग अनावर होण्याची शक्यता असते. त्या रंगाने गोऱ्या आणि थोड्या प्रमाणात गुलाबी रंगाच्या असतात आणि त्यांचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. अशा स्त्रिया हुशार आणि बुद्धीवान देखील असतात. कोणत्याही व्यक्तीला पहिल्या दिवशी भेटल्याबरोबर त्यांच्यावर आपला प्रभाव पाडत असतात. या महिलांचे संबंध जितक्या लवकर तयार होतात तितक्या लवकर ते बिघडतात. 

जुलै आणि ऑगस्ट 

ज्या महिलांचा जन्म जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होत असतो त्यांना त्यांच्या जीवनात राणीसारखे सुख मिळत असते, यांच्यामध्ये चांगल्यातील चांगले गुण असल्याचे पाहायला मिळते. यामुळेच त्यांना प्रत्येक ठिकाणी आदर आणि सन्मान मिळत असतो. त्यांचे वर्तन संयम आणि शांत आहे. या स्त्रिया तत्त्वांवर ठाम आहेत आणि शिस्तीवर प्रेम करतात.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 

या दोन महिन्यात जन्मलेल्या महिला खूप भाग्यवान असतात. अशा स्त्रिया श्रीमंत होण्यासाठी मेहनत आणि सर्व कामे करण्यात तयार असतात. त्या त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबाची जास्त काळजी घेत असतात. ते त्यांच्या कामाला आणि भावनांना दाबून ठेवत असतात. प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेणे त्यांच्या स्वभावात आहे, जरी ते आनंदी स्वभावाचे असले तरी त्यांना चटकन राग येतो. यामुळे त्यांना अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी ते आशेवर बांधले जाते आणि जेव्हा त्या अपयशी ठरतात तेव्हा त्या लगेचच निराश होतात. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर 

या दोन महिन्यांत जन्मलेल्या स्त्रिया लहान उंचीच्या असतात, त्या आकाराने लहान मानेच्या आणि सावळ्या रंगाच्या असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची फार लवकर भीती वाटते. अशा स्त्रिया त्यांच्या प्रेमावर अधिक संशय घेत असतात. ते कामाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचा जीवनसाथी त्यांच्यापासून अधिककाळ दूर राहतो. काहीवेळा ते अपशब्दही बोलतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागतो. लक्षणीय बाब म्हणजे अशा स्त्रिया बचतीच्या बाबतीत तज्ञ आहेत त्या पैशांची बचत करण्यात माहीर असतात तसेच आपल्या कुटुंबाला वाईट काळापासून वाचवतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी