Solar System: शुक्र गुरूची आकाशातील 'भेट' का अनोखी मानली जाते; जाणून घ्या यामागील खास कारण 

आध्यात्म
Updated May 05, 2022 | 11:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Venus and Jupiter conjunction । अंतराळवीरांसाठी शेवटचा रविवार खूप खास होता. या दिवशी लोकांना सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आणि बृहस्पती यांचे संक्रमण पाहायला मिळाले. या संक्रमणाचे दृश्य खगोलशास्त्रज्ञांसाठी खूप महत्त्वाचे होते आणि अनेकांनी ते त्यांच्या दुर्बिनेच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

Find out why the visit of Venus and Jupiter in the sky is considered unique
...म्हणून शुक्र गुरूची आकाशातील 'भेट' अनोखी मानली जाते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंतराळवीरांसाठी शेवटचा रविवार खूप खास होता.
  • सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून जास्त अंतरांच्या दृष्टीने दुसरा ग्रह आहे.
  • ग्रहांचे हे संक्रमण ज्याला इंग्रजीमध्ये प्लॅनेटरी कंजंक्शन आणि ज्योतिषाच्या भाषेत युती असे म्हणतात.

Venus and Jupiter conjunction । मुंबई : अंतराळवीरांसाठी (Stargazers) शेवटचा रविवार खूप खास होता. या दिवशी लोकांना सूर्यमालेतील (Solar System) सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आणि बृहस्पती यांचे (Venus and Jupiter conjunction) संक्रमण पाहायला मिळाले. या संक्रमणाचे दृश्य खगोलशास्त्रज्ञांसाठी खूप महत्त्वाचे होते तसेच अनेकांनी ते त्यांच्या दुर्बिनेच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून लाखो किलोमीटर दूर आहेत, दोघेही पृथ्वीच्या वेगवेगळ्या दिशांना आहेत म्हणजेच एक सूर्याजवळ तर दुसरा सूर्यापासून खूप दूर. तरी देखील दोघांना एकत्रित पाहण्याचा खगोलप्रेमींचा अनुभव चक्रावून सोडणारा होता. (Find out why the visit of Venus and Jupiter in the sky is considered unique). 

अधिक वाचा : पूर्व दिशेला घर असल्यास या वास्तु टिप्स देतील शुभ लाभ

दोघांमध्ये कधीच टक्कर होऊ शकत नाही

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून जास्त अंतरांच्या दृष्टीने दुसरा ग्रह आहे, तर गुरू ग्रह हा पाचवा ग्रह आहे. या यादीत पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, एकमेकांची टक्कर होणे ही तर दूरचीच गोष्ट. मात्र सूर्याभोवती फिरत असताना अशी परिस्थिती नक्कीच निर्माण होते की शुक्राच्या अगदी मागे गुरू ग्रह आल्यावर दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात. 

प्रत्यक्षात नक्की काय होते

दरम्यान, अशा स्थितीत पृथ्वीवरून असे दिसते की दोन्ही ग्रह एकमेकांवर आदळतात, तर प्रत्यक्षात गुरू ग्रह शुक्राच्या मागे येतो आणि दोन्ही ग्रहांची भेट होत असल्याचे दिसते. जरी दोन्ही ग्रह दरवर्षी एकमेकांना भेटताना दिसले असले तरी या वर्षाची खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसले जे दरवर्षी होत नाही. 

आता तब्बल १७ वर्षांनंतर दिसणार असे दृश्य

दोन्ही ग्रह अशा प्रकारे जवळ येण्याची घटना आता पुढच्या वेळी तब्बल १७ वर्षांनंतर म्हणजेच २०३९ मध्ये घडेल. दूरच्या दुर्बिनच्या साहाय्याने किंवा कोणत्याही उपकरणाशिवाय ही घटना उघड्या डोळ्यांनी पाहिली जाऊ शकते आणि शिवाय शुक्र आणि गुरू हे तेजस्वी ग्रह असल्यामुळे हे दृश्य आणखीच सुंदर दिसते. 

नक्की काय असते ही 'भेट'

ग्रहांचे हे संक्रमण ज्याला इंग्रजीमध्ये प्लॅनेटरी कंजंक्शन (Planetary conjunction) आणि ज्योतिषाच्या भाषेत युती (Yuti) असे म्हणतात. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात आणि अगदी एकमेकांना स्पर्श करताना दिसतात किंवा भेटताना दिसतात तेव्हा भेट अथवा मिलन होते. शेवटच्या शनिवारी रात्री आणि रविवारीही जगातील अनेक देशांमध्ये शुक्र आणि गुरू हळहळू एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. मात्र प्रत्यक्षात दोघेही एकमेकांपासून खूप दूर आहेत. 

दोन्ही ग्रहांमध्ये किती अंतर आहे?

गुरू आणि शुक्र ग्रहाच्या कक्षेतील अंतर तब्बल ४३ दशलक्ष मैल आहे. पण सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना एक वेळ अशी येते की दोन्ही ग्रह पृथ्वीपासून एकाच दिशेला असतात आणि एकाच रेषेत असतात. तेव्हा पृथ्वीवरून असे दिसते की दोन्ही ग्रह एकत्र येत आहेत. जिथे शुक्र ग्रहाचा व्यास फक्त १२ हजार किलोमीटर आहे, तिथे गुरू ग्रहाचा व्यास फक्त १४३ हजार किलोमीटर आहे.

दोन्ही ग्रहांमधील तेजस्वीपणा

दोन्ही ग्रहांच्या तेजस्वीपणातही फरक आहे. शुक्र ग्रह गुरूपेक्षा जास्त तेजस्वी आहे. तर गुरु ग्रह थोडा कमी तेजस्वी दिसतो. बृहस्पति ग्रहाची चमक शुक्र ग्रहाच्या एक षष्ठांश इतकी आहे. तसेच जर तेजस्वीपणाचे प्रमाण पाहिले तर शुक्राच्या तेजाचे प्रमाण -४.१ आहे आणि गुरूच्या तेजाचे प्रमाण -२.१ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी