Apara Ekadashi 2022: अपरा एकादशीच्या दिवशी या १० नियमांचे करा पालन; मिळेल अपार समृद्धी

आध्यात्म
Updated May 25, 2022 | 12:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Apara Ekadashi 2022 Niyam । अपरा एकादशीचे व्रत २६ मे गुरूवारच्या दिवशी केले जाईल. अपरा एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने अपार पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. म्हणूनच याला अपरा एकादशी असे म्हणतात.

Follow these 10 rules on the day of Apara Ekadashi
अपरा एकादशीच्या दिवशी या १० नियमांचे करा पालन, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • अपरा एकादशीचे व्रत २६ मे गुरूवारच्या दिवशी केले जाईल.
 • काही लोक याला अचला एकादशी असे देखील म्हणतात.
 • एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे.

Apara Ekadashi 2022 Niyam । मुंबई : अपरा एकादशीचे व्रत २६ मे गुरूवारच्या दिवशी केले जाईल. अपरा एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने अपार पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. म्हणूनच याला अपरा एकादशी असे म्हणतात. काही लोक याला अचला एकादशी असे देखील संबोधतात. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. यावेळी अपरा एकादशी गुरुवारच्या दिवशी येत आहे. अशा स्थितीत अपरा एकादशी आणि गुरुवार या दोन्हींचा योगायोग जुळल्याने या एकादशीचे पुण्य अधिक वाढले आहे. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. (Follow these 10 rules on the day of Apara Ekadashi). 

अधिक वाचा : 800 वर्ष जुन्या इतिहासावर कोर्टात चर्चा, जाणून घ्या प्रकरण

अपरा एकादशीच्या पूजेचे प्रमुख १० नियम

अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने सर्व भक्तांना अपार सुख आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते. परंतु उपवास करणाऱ्याने आपल्या उपासनेत खाली दिलेल्या प्रमुख १० नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

 1. अपरा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून नियमित कामे उरकून गंगाजलाने स्वच्छ स्नान करावे.
 2. अंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. 
 3. पूजेसाठी पूर्व दिशेला पाठ ठेवून त्यावर पिवळे कापड पसरवावे.
 4. आता त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा.
 5. यानंतर भगवंताला धूप दिवा लावा आणि कलश स्थापित करा.
 6. फळे, फुले, सुपारी, नारळ, लवंग इत्यादी पूजेचे साहित्य भगवंताला अर्पण करावे.
 7. भक्ताने स्वतः देखील पिवळ्या आसनावर अथवा पाठावर बसावे.
 8. भाविकांनी उजव्या हातात पाणी घेऊन त्यांच्या संकटांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करावी. 
 9. दिवसभर उपवास करून संध्याकाळी अपरा एकादशीची व्रत कथा वाचा किंवा ऐका.
 10. व्रत संपल्यानंतर फळे खावीत आणि व्रताची सांगता फक्त शुभ मुहूर्तावरच करावी. 

अचला/अपरा एकादशीचा शुभ मुहूर्त

एकादशी तिथीची सुरुवात: २५ मे २०२२ सकाळी १०:३० पासून
एकादशी तिथीची समाप्ती: २६ मे २०२२ सकाळी १०:५४ वाजता
एकादशी व्रताची वेळ: २७ मे २०२२ सकाळी ५:३० ते ८.०५ 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी