मुंबई: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत साजरे केले जाते. हरतालिकेच्या दिवशी कठीण उपवास केला जातो. या वर्षी हरतालिकेचे व्रत मंगळवारी म्हणजेच ३० ऑगस्ट २०२२ला केले जाणार आहे. या दिवशी महिला उपवास करतात. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पुजा करतात. For husband long life do this upay
अधिक वाचा - Liger review अनेकांना आवडला VDचा 'Liger' अभिनय
हरतालिकेच्या व्रतात महिला निर्जळा व्रत करतात. या दरम्यान अनेक कठीण नियमांचे पालन करावे लागते. या दरम्यान महिलांना अन्न, जल तसेच फळाचा त्याग करावा लागतो. अशातच हे व्रत खूप कठीण असे मानले जाते.
महिलांना हरतालिकेचे व्रत हे निर्जळी ठेवावे लागते. तर दिवसा आणि रात्री झोपणेही वर्ज्य असते. यावेळी महिला रात्री जागकरण करत भजन-कीर्तन करतात. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
यावेळेस हरतालिकेच्या दिवशी शुभ योगायोग बनत आहे. हा शुभ योगायोग सकाळी सुरू होऊन रात्री १२ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहणार आहे. यावर्षी हस्त नक्षत्राची साथ मिळत आहे. या नक्षत्रात पाच तारे आहेत जे आशीर्वाद मुद्रेत दिसतात.
अधिक वाचा - आयसीएसआय सीएस जून २०२२ परीक्षेच्या निकालाचा दिवस
या दिवशी महिलांनी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. मातीच्या भगवान गणेश, शंकर आणि माता पार्वतीच्या प्रतिमा असाव्यात. शंकराला गंगाजल, दही, दूध, मधाने स्नान घालावे. तसेच फूल, बेलपत्र, धोतराची फुले चढवावी. तसेच पार्वतीचीही पुजा करावी. असे केल्याने पुजेचे लवकर लाभ मिळतात.