Friday special Lakshmi mata Aarti: संपत्ती आणि समृद्धीसाठी लक्ष्मी देवीला असं करा प्रसन्न

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 24, 2022 | 17:36 IST

पैसा ही खरंच प्रत्येकाच्या जीवनातील एक गरज आहेहिंदू पौराणिक (Hindu mythology) कथेनुसार, लक्ष्मी माता (Lakshmi Mata) ही पैशाची किंवा संपत्तीची देवी आहे. या देवीला प्रसन्न करण्यासाठी उद्या शुक्रवारी लक्ष्मी देवीचा जाप करा, तिची पूजा करा. या पूजेत लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर तुमच्या धनाची वर्षा होईल.

Friday special Lakshmi mata Aarti
संपत्ती आणि समृद्धीसाठी लक्ष्मी देवीला असं करा प्रसन्न   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लक्ष्मी माता (Lakshmi Mata) ही पैशाची किंवा संपत्तीची देवी आहे.
  • लक्ष्मी देवी ही भगवान विष्णूची पत्नी आहे.
  • या देवीचे चार हात मानवी जीवनाची चार ध्येये दर्शवतात- धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष.

नवी दिल्ली : आजच्या भौतिकवादी जगात पैसा हे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले इंधन आहे. याचसाठी आपण इतकी कठोर मेहनत घेत असतो. थोडे जास्त पैसे मिळतात म्हणून आपण घर सोडून लांब गावापासून दूर असलेल्या शहरात नोकरी करत असतो. पैसा ही खरंच प्रत्येकाच्या जीवनातील एक गरज आहे
हिंदू पौराणिक (Hindu mythology) कथेनुसार, लक्ष्मी माता (Lakshmi Mata) ही पैशाची किंवा संपत्तीची देवी आहे. या देवीला प्रसन्न करण्यासाठी उद्या शुक्रवारी लक्ष्मी देवीचा जाप करा, तिची पूजा करा. या पूजेत लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर तुमच्या धनाची वर्षा होईल. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही महालक्ष्मीची आरती म्हणा, तिचा जाप करा.  आज आप लक्ष्मी मातेचा जाप आणि लक्ष्मी मातेची आरती जाणून घेणार आहोत.  (Please do this to Goddess Lakshmi for wealth and prosperity)

अधिक वाचा  :हस्तांदोलन करण्याची योग्य पद्धत कोणती?

 खाली नमूद केलेल्या लक्ष्मी मंत्रांचा मनापासून जप करून संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीची देवी- 'लक्ष्मी' प्रभावित करा! लक्ष्मी देवी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. या देवीचे चार हात मानवी जीवनाची चार ध्येये दर्शवतात- धर्म, काम, अर्थ आणि मोक्ष.

संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी  लक्ष्मी देवीला कसे प्रसन्न करायचे: 

अधिक वाचा  :  नागपूरकरांसाठी गडकरींची जबरदस्त आयडिया!

लक्ष्मी माता बीज 

ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥

ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥

महालक्ष्मीची आरती 

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
 
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी...॥
 
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी...॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
 
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी...॥
 
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी...॥

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी