Ganapatichi Aarti Marathi Lyrics, Ganapati Aarti Marathi Lyrics, Marathi Aarti Sangrah : गणपती हे आराध्य दैवत आहे. शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने होते. गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती केली जाते. सकाळी 9 वाजण्याच्या आधी आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर आरती करावी. आराधना करण्यासाठी गणपतीची आरती करतात. मनोभावे गणपतीची पूजा आणि गणपतीची आरती केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे सांगतात.
कीर्तनकार इंदूरीकरांच्या सासूबाईंचा भाजपमध्ये प्रवेश; बाळासाहेब थोरात गटाला धक्का
साहेब मला माफ करा...; शिवाजी पार्कमध्ये झळकलेल्या बॅनरची चर्चा
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥१॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ध्रु॥
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥२॥
॥ जय देव जय देव॥
भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥
॥ जय देव जय देव॥
नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
॥ जय देव जय देव॥
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
॥ जय देव जय देव॥
वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती।
अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती।
मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती ॥१॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा।
तुझा न कळे पार शेषा फणिवरा ॥ध्रु॥
पुळ्यापश्ये नांदे महागणपती।
माघ चतुर्थीला जनयात्रे येती।।
जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती।
गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥२॥
॥ जय देव जय देव॥
एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी।
आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी।
विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥
॥ जय देव जय देव॥
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।