Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला, मग या संकेतांकडे नका करू दुर्लक्ष

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 25, 2022 | 08:36 IST

हिंदू धर्मात  (Hinduism) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) सणाला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद (Bhadrapada) महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशजींचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून दरवर्षी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. यंदा 31 ऑगस्ट रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणेश उत्सव हा 10 दिवस चालतो आणि या दिवशी गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते.  

If a mouse is seen in the house on Ganesh Chaturthi, is it auspicious or inauspicious
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात उंदीर दिसला तर शुभ असतं का अशुभ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गणेश उत्सव हा 10 दिवस चालतो आणि या दिवशी गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते.
  • भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशजींचा जन्म झाला.
  • गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर शुभ असतं की अशुभ

Ganesh Chaturthi 2022 Jyotish Shastra: हिंदू धर्मात  (Hinduism) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) सणाला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद (Bhadrapada) महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशजींचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून दरवर्षी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. यंदा 31 ऑगस्ट रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणेश उत्सव हा 10 दिवस चालतो आणि या दिवशी गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते.  गणेश चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते.

गणेश चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी 03.33 पासून होत आहे. जो 31 ऑगस्ट रोजी दुपारी 03.31 पर्यंत राहील.या दिवशी घरामध्ये गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. गणपती बाप्पा यांचे वाहन उंदीर आहे. उंदीर सामान्यतः घरांमध्ये आढळतात. प्रत्येकाला उंदरापासून मुक्ती मिळवायची आहे. कारण अनेक वेळा ते घरात ठेवलेल्या वस्तूंचेही नुकसान करतात, त्यामुळे घरात उंदीर दिसावे असे कोणालाच वाटत नाही. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर जाणून घ्या तो काय सूचित करते.

उंदीर नकारात्मकता आणतो ( Ganesh Chaturthi 2022 Jyotish Shastra)

गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर त्याला मारण्याची चूक करू नका. त्यापेक्षा पळवण्याचा प्रयत्न कराभगवान गणेशाला बुद्धीची देवता मानले जाते आणि तो उंदरावर स्वारी करत असतात. अशा स्थितीत उंदीर दिसला की घरात राहणाऱ्या सदस्यांची बुद्धी भ्रष्ट होत असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार उंदीर घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात उंदीर दिसणे अशुभ लक्षण मानले जाते.

उंदीर निघणे हे चांगले लक्षण 

गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर तो शुभ संकेत देतो. ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की उंदीर घरातून गरीबी घेऊन सुख-समृद्धी सोडून जातो.

सकाळी उठून उंदीर दिसणं असतं अशुभ

सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला उंदीर दिसला तर समजा तुमचे काही काम बिघडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही चिन्हे अशुभ मानली जातात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.

(डिस्क्लेमर : हे अभ्यासक्रम साहित्य सामान्य समजुती आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामग्रीवर आधारित लिहिले गेले आहे. टाईम्स नाऊ याला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी