Ganesh Chaturthi 2022 Mundkatiya Temple Uttarakhand: सगळ्यांचा लाडका देव म्हटला म्हणजे आपले गणपती बाप्पा (Ganapati Bappa). दोन दिवसानंतर गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी दहा दिवसांसाठी विराजमान होणार आहेत. या दहा दिवसात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची सेवा केली जाते. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर भागातही गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव साजरा केला जातो.
देवभूमी उत्तराखंडच्या (Uttarakhand) रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्ह्यात असलेल्या मुंडकटिया मंदिरालाही दरवर्षी देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडत असते. केदार डोंगराच्या कुशीत असलेल्या या मंदिराचे अजून ऐक वैशिष्ट्ये आहे. ते म्हणजे भाविक येथे मस्तकहीन गणेशाची पूजा करतात. आज आपण या गणपती बाप्पाविषयी जाणून घेणार आहोत.
Read Also : गणेश चतुर्थीला बनवा Sugar Free मोदक आणि बासुंदी, सोपी रेसिपी
मुंडकटिया हे नाव दोन शब्दांपासून बनले आहे. प्रथम मुंड म्हणजे डोके आणि कटिया म्हणजे विच्छेदन. मुंडकटिया मंदिर गढवाल विभागातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे सोनप्रयागपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. शिवपुराणानुसार भगवान महादेवाने त्यांचा पुत्र गणेशाचा शिरच्छेद केला. त्यावेळी माता पार्वती गौरी कुंडात स्नान करत होती. माता पर्वतीने हळदीच्या पेस्टपासून मानवी शरीर बनवले आणि त्यात जीव टाकला. यानंतर माता पार्वतीने त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यावेळी आई पार्वतीने मुलाला आदेश दिला की, आत कोणालाही प्रवेश देऊ नये.
Read Also : दुस-यांदा कोरोना पॉझिटिव्ह होणं किती आहे खतरनाक
आई पार्वतीच्या आज्ञेचे पालन करून गणेशाने भगवान शंकरांनाही खोलीत प्रवेश दिला नाही. यावर संतप्त होऊन भगवान महादेवाने आपल्या मुलाचा शिरच्छेद केला. महादेव आपले वडील आहेत हे माहितीन नव्हते, तसेच महादेव यांनाही गणेश त्यांचा मुलगा हे माहिती नव्हते. ज्यावेळी हे सर्व जेव्हा पार्वती माताला समजलं तेव्हा त्यांनी महादेवाला आपला मुलाला परत मागितलं. त्याला जीवनदान देण्यास सांगितलं. त्यावेळी कोणत्या व्यक्तीचे शीर मिळाले नसल्याने महादेवाने गणेशजींच्या धडावर हत्तीचं मुडकं बसवलं आणि त्यात प्राण सोडले. तेव्हापासून येथे मस्तकहीन गणपतीची पूजा केली जाते. दरम्यान हे मंदीर त्रियुगी नारायण मंदिराच्या अगदी जवळ आहे. या मंदिरात जाण्यासाठी सोनप्रयाग येथून पायी जावे लागते. किंवा तुम्ही स्थानिक टॅक्सीने देखील जाऊ शकता.