Ganesh Jayanti 2023 Date Shubhmuhurat: भारतात सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करण्यात येत असतात. गणेशोत्सवात हा उत्साह शिगेला पोहोचतो. पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी व्रत पाळले जाते. तसेच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिथीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते. या गणेश चतुर्थीला गणेश जयंती, माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. (Ganesh Jayanti 2023 maghi ganpati date puja time shubh muhurat in marathi)
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा होतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करण्यात येतो.
या महिन्यातील वरद चतुर्थी खूपच खास आहे. कारण, श्रीगणेशाला समर्पित बुधवारच्या दिवसांसोबतच अनेक शुभ योग तयार होत आहेत. जाणून घ्या गणेश जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि इतर माहिती.
हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारी रोजी दुपारी 3.22 वाजता सुरू होत आहे. तर बुधवार (25 जानेवारी) दुपारी 12.34 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तिथीनुसार, यंदा गणेश जयंती बुधवारी (25 जानेवारी 2023) रोजी साजरी केली जाईल.
हे पण वाचा : झोपण्यासाठी अशी खरेदी करा मऊ गादी, आयुष्याची होईल चांदी
शास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करू नये असे मानले जाते. या दिवशी चंद्र दर्शन झाल्यास कलंक लागतो अशी मान्यता आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी सकाळी 09.54 ते रात्री 9.55 पर्यंत चंद्र दर्शन करू नये.
पंचांगानुसार, जानेवारी महिन्यात पंचक 27 तारखेपर्यंत आहे. यामुळे गणेश जयंतीचा उपवास पंचकातच राहणार आहे. पंचक 23 जानेवारीला दुपारी 01.51 वाजता सुरू होईल आणि 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजू न 37 मिनिटांपर्यंत असेल.