Ganesh Jayanti 2023 Marathi Wishes: माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या गणू बाप्पाचा जन्मदिवस. माघ महिन्याच्या शुल्क पक्षात चतुर्थी दिवशी गणू बाप्पाचा जन्म झाला, अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा 25 जानेवारी रोजी गणेश जयंती साजरी होणार आहे. यादिवशी विनायक चतुर्थी आहे. याला तिलकुंद चतुर्थीही म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगाव येथे पालखी यात्रा काढली जाते.
अधिक वाचा : Ganpati Atharvashirsha Marathi : संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष आणि पठणाचे नियम
अधिक वाचा : वयाची साठी आली तरी नीता अंबानी दिसतात तिशीच्याच; पाहा सिक्रेट डाएट प्लॅन
भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र असलेले गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहेत. सर्व कार्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच बाप्पावर अनेकांची विशेष भक्ती आहे. गणेश जयंती निमित्त तर ही भक्ती अधिक द्विगुणित होते. सर्व गणेशभक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.
अनेक जण आपल्या घरी माघी गणेशची प्रतिष्ठापना करतात. तसेच काही गणेश मंडळ या काळात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे भाद्रपद महिन्यात जसा उत्साह असतो तसाच काहीसा उत्साह माघी गणेश जयंतीला असतो.
सध्याच्या डिजिटल युगात गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, GIF's तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) वर शेअर करुन शुभेच्छा देऊ शकता. मग यंदा नातेवाईक, मित्रमंडळी, गणेशभक्तांसह हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा.
अधिक वाचा : भारतातील या ठिकाणी मुलं झाल्यानंतर होतात लग्न
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
Ganesh Jayanti 2023 Wishes । Photo : BCCL
अधिक वाचा : लवकरच तुमचे Pan card होणार बंद !, Aadhar शी लिंक करण्याची सरकारची डेडलाईन
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे...
माघी गणेश जयंती च्या मंगलमय शुभेच्छा!
Ganesh Jayanti 2023 Wishes । Photo : BCCL
बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!
माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
अधिक वाचा : मुलांच्या मनातील भीती कशी काढायची?
Ganesh Jayanti 2023 Wishes । Photo : BCCL
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती|
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती||
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh Jayanti 2023 Wishes । Photo : BCCL
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
नसानसात भरली स्फुर्ती..
गणपती बाप्पा मोरया!
माघी गणेश जयंती च्या शुभेच्छा!
Ganesh Jayanti 2023 Wishes । Photo : BCCL
तुम्हा सर्वांना टाइम्स नाऊ मराठीकडून माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!