Mumbaicha Raja Ganpati Video: गणेश चतुर्थीला अवघे काही तास शिल्लक आहेत. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक उत्सुक आहेत. मुंबईतील लालबाग गणेश गल्ली मंडळाचं यंदाचे 95 वे वर्ष आहे. यंदाची गणपती बाप्पाची मूर्ती ही खूपच आकर्षक आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या या गणरायाची पहिली झलक आज पहायला मिळाली. (Ganeshotsav 2022 Mumbaicha raja ganesh galli ganpati mukh darshan first look video watch lalbaug sarvajanik utsav mandal)
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मंडळाची यंदाच्या वर्षी 22 फूटांची भव्य गणेशमूर्ती आहे. विश्वकर्मा रुपात गणरायाची मूर्ती आहे. ही मूर्ती खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आणि मंडळांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
liveMumbaicha Raja | 2022 | प्रथम दर्शन २०२२ Posted by Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli on Tuesday, August 30, 2022
दक्षिण मुंबईतील लालबाग परिसरातली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे मंडळ सर्वात जुने मंडळ मानले जाते. या मंडळाची स्थापना 1928 मध्ये झाली होती. यंदा मंडळाच्या गणेशोत्सवाचे 95वे वर्ष आहे.
या मंडळाने 1977 मध्ये देशातील पहिली 22 फुटी गणरायाची उत्सवमूर्ती बनवली होती. भारतातील तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे आणि इतर स्थळांचा देखावा या मंडळाकडून उभारण्यात येत असतो. आतापर्यंत मंडळाकडून विविध देखावे उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, मदुराईचे मिनाक्षी मंदिर, हिमालय-केदारनाथ मंदिर या सारख्या देखावांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी काशी विश्वनाथाचे दर्शन गणेश गल्लीत घडणार आहे. या ठिकाणी काशी विश्वनात मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
अधिक वाचा : Happy Ganesh Chaturthi 2022 Massages in Marathi : बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची Facebook आणि Whatsapp मेसेज
यंदाच्या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. तर 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी 9 सप्टेंबर रोजी असल्याने 10 दिवसांच्या गणरायाचे या दिवशी विसर्जन होईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गणेशगल्ली परिसरातून सकाळी 8 वाजता सुरू होते. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य आणि खास बाब म्हणजे मुंबईतून विसर्जनासाठी निघण्याचा पहिला मान हा याच गणेश गल्लीच्या राजाचा असतो.