Thumb Palmistry: अंगठ्यावरून जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची वैशिष्ट्ये

Thumb Palmistry । हस्तरेखा शास्त्रामध्ये हाताच्या सोबतच बोटे, अंगठा आणि नखांच्या आकारावरून व्यक्तीच्या आरोग्याशी आणि आयुष्याशी संबंधित अनेक पैलू असतात ज्यांची माहिती मिळवली जाऊ शकते.

Get to know the personality and characteristics of a person from the thumb
अंगठ्यावरून जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • हस्तरेषाशास्त्रानुसार अंगठ्याची लवचिकता आणि माणसाचा स्वभाव यांचा एकमेकांशी खूप संबंध आहे.
 • जर नखाचा भाग लहान तसेच रुंद असेल, तर अशी व्यक्ती खूप हट्टी असते.
 • जर नखाचा भाग खूप रुंद आणि समोर गोल असेल तर ती व्यक्ती खूप हट्टी आणि रागीट असते.

Thumb Palmistry । मुंबई : हस्तरेखा शास्त्रामध्ये हाताच्या सोबतच बोटे, अंगठा आणि नखांच्या आकारावरून व्यक्तीच्या आरोग्याशी आणि आयुष्याशी संबंधित अनेक पैलू असतात ज्यांची माहिती मिळवली जाऊ शकते. हातांच्या बोटांमध्ये एक अंगठा देखील आहे, मात्र त्याचे महत्त्व वेगळे आहे. हाताचा अंगठा संपूर्ण हाताचे प्रतिनिधित्व करत असतो. त्याची रचना माणसाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल संपूर्ण माहिती देते. ज्योतिषशास्त्रामध्ये अंगठ्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. चला तर म जाणून घेऊया अंगठा त्याच्या आयुष्याशी निगडीत कोणती गुपिते उघड करतो. (Get to know the personality and characteristics of a person from the thumb). 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी घाला या गोष्टी

 1. हस्तरेखा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याचा पहिला भाग म्हणजेच नखाचा भाग लांब असेल तर समजून घ्या की या प्रकारच्या व्यक्तींना लोकांवर प्रभाव ठेवायला आवडते. या व्यक्ती प्रत्येक गोष्टीत स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. 
 2. जर नखाचा भाग लहान तसेच रुंद असेल, तर अशी व्यक्ती खूप हट्टी असते. अशा व्यक्तीला कोणतेही काम करण्यास भाग पाडू नये अन्यथा त्यांची खूप चिडचिड होते.
 3. जर नखाचा भाग खूप रुंद आणि समोर गोल असेल तर ती व्यक्ती खूप हट्टी आणि रागीट असते. इतकेच नाही तर जेव्हा त्यांना खूप राग येतो तेव्हा ते भांडण्यासही तयार असतात. 
 4. जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा मागे वाकलेला असेल तर ती व्यक्ती खूप उदार मनाची असते. तसेच हा अंगठा पाठीमागे खूप झुकलेला असेल तरीदेखील ती व्यक्ती खूप उदार असते.
 5. -  अंगठ्याचा पहिला भाग जर जड आणि जाड असेल तसेच नखे सपाट असतील तर अशा व्यक्तीला खूप राग येतो. त्यांचा राग अनावर होऊ शकतो. अंगठ्याचा पुढचा भाग अगदी गदासारखा असेल तर व्यक्ती रागावल्यावर योग्य की अयोग्य याचा विचार करत नाही.
 6. दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीचा दुसरा अंगठा खूप लांब असेल तर अशी व्यक्ती प्रत्येक विषयावर बराच वेळ बोलते, परंतु कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे जर ते साधारणपणे उंच असेल तर अशा व्यक्तीकडे चांगली तर्कशक्ती असते.
 7. जर एखाद्या व्यक्तीचा अंगठा लहान आणि जाड असेल तर अशा व्यक्तीचा स्वभाव गोंधळलेला असतो. ते काय विचार करत आहेत हे कोणीच सहज समजू शकत नाही. असे लोक त्यांच्या मनासारखे झाले नाही तर घाईघाईने चुकीचे पाऊल उचलू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना संयम बाळगा आणि दक्षता बाळगा.
 8. हस्तरेषाशास्त्रानुसार अंगठ्याची लवचिकता आणि माणसाचा स्वभाव यांचा एकमेकांशी खूप संबंध आहे. ज्यांचा अंगठा लवचिक असतो आणि पाठच्या बाजूला जास्त मोडतो, अशा व्यक्तीमध्ये कोणाशीही मैत्री करण्याची क्षमता असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी