नवरात्री २०२० घटस्थापना मुहूर्त: १७ ऑक्टोबर रोजी 'या' मुहूर्तावर करा घटस्थापना, जाणून घ्या विधी आणि नियम

आध्यात्म
Updated Oct 17, 2020 | 08:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

नवरात्रीच्या घटस्थापनेतील मुहूर्त आणि विधी २०२०: यावर्षी शारदीय नवरात्र १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. जाणून घ्या नवरात्रीत कोणत्या वेळी घटस्थापना करायची आहे. सोबतच पाहा घटस्थापनेचा पूर्ण विधी.

Narvatri 2020
नवरात्री २०२० घटस्थापना मुहूर्त: १७ ऑक्टोबर रोजी या मुहूर्तावर करा घटस्थापना, जाणून घ्या विधी आणि नियम  |  फोटो सौजन्य: Shutterstock

थोडं पण कामाचं

 • कधी आणि कशी कराल घटस्थापना
 • पहिल्या नवरात्रीत केली जाते घटस्थापना
 • सकाळी ०६:२७पासून सुरू होणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त

मुंबई: देवी दुर्गेच्या (Goddess Durga) नावाने ओळखल्या जाणाऱ्या शक्तिरुपाची पूजा करण्याचे ९ दिवस १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. भारतात (India) नवरात्रीला (Navratri) विशेष महत्व आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून ते दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधीवत पद्धतीने दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा (worship) केली जाते. हे नऊ दिवस हर्षोल्हासाने भरलेले असतात. रात्री जागरण असते, काहीकडे दांडियाही खेळला जातो.

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सरकारने मंडप आणि सामूहिक दांडियावर बंधने घातली आहेत, पण लोक आपापल्या घरी हे नऊ दिवस पूर्ण उत्साहाने साजरे करू शकतात. हिंदू मान्यतांप्रमाणे नवरात्री वर्षातून चारवेळा येते ज्यात चैत्र आणि शारदीय नवरात्री विशेष महत्वाच्या असतात. तर दोन गुप्त नवरात्रीही असतात.

घटस्थानपेचा शुभमुहूर्त

हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचाय एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. या वर्षी हा मुहूर्त पहिल्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी ०६:२७पासून ते सकाळी १०:१३पर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:४४पासून ते १२:२९पर्यंत असेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना केली जाते.

घटस्थापनेची सामग्री

 1. पाण्याने भरलेला पितळे, चांदी किंवा तांब्याचा कलश,
 2. पाणी असलेला नारळ,
 3. नारळ गुंडाळण्यासाठी लाल रंगाचे कापड किंवा चुनरी,
 4. कुंकू,
 5. पाच ते सात आंब्याची पाने,
 6. कलश झाकण्यासाठी झाकण,
 7. लाल धागा,
 8. सुपारी, तांदूळ आणि नाणी.

घटस्थापनेचा विधी

 1. घराच्या आग्नेय दिशेला कोणत्याही जागी चांगली स्वच्छता करून घटाची स्थापना करा. ही दिशा पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते.
 2. कलश स्थापित करण्यासाठी मुहूर्तातच आधी श्रीगणेशाची पूजा जिथे कलशस्थापना करायची आहे तिथे एक स्वच्छ लाल कापड घाला आणि नारळावर कापड गुंडाळून कुंकू किंवा चंदनाने स्वस्तिक काढा.
 3. कलशात गंगाजल भरा आणि त्यात आंब्याची पाने, सुपारी, हळकुंड, दुर्वा आणि पैसे घाला.
 4. जर कलशाच्या वर झाकण घालायचे असेल तर झाकणात तांदुळ घाला, अन्यथा कलशात आंब्याची पाने घाला.
 5. यानंतर कलशावर नारळ ठेवा आणि दिवा लावून पूजा करा.
 6. लक्षात ठेवा, देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच कलशस्थापना करायची असते.

कोणत्या दिवशी कराल कोणत्या देवीची पूजा

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते. १७ ऑक्टोबर रोजी देवी शैलपुत्रीची पूजा करतात आणि याच दिवशी घटस्थापनाही होते. १८ ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. १९ ऑक्टोबर रोजी देवी चंद्रघटेची, २० ऑक्टोबर रोजी देवी कुष्मांडाची पूजा होते. २१ ऑक्टोबर म्हणजे पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. २२ ऑक्टोबर रोजी देवी कात्यायनीची तर २३ ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. २४ ऑक्टोबर रोजी देवी महागौरीची आणि २५ ऑक्टोबर रोजी देवी सिद्धिदात्रीची पूजा होते.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी