नवी दिल्ली : हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी चैत्र पौर्णिमा शनिवार, १६ एप्रिल २०२२ रोजी येत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते आणि रामनवमी 10 एप्रिल रोजी साजरी केली जाते. या दिवशी रामजींचा जन्म झाला अशी धार्मिक श्रद्धा आहे. दुसरीकडे, चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते, भगवान हनुमानाला विशेष नैवेद्य दिलं जातं. एवढेच नाही तर या दिवशी बजरंग बलीला चोळ अर्पण केला जातं. त्याचबरोबर या दिवशी राशीनुसार बजरंग बलीला भोग दिला जातो. असे केल्यानं ते अधिक फलदायी असल्याचं असे ज्योतिषशास्त्रा सांगते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला कोण-कोणत्या राशीचे लोक कोण-कोणते नैवेद्य देऊ शकतात याची आपण माहिती आज घेणार आहोत...
राशीनुसार बजरंग बालीला अर्पण करा
पंचांगानुसार या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा शनिवार, १६ एप्रिल रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी सुरू होत आहे. या दिवशी दुपारी १२.२४ वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. सूर्योदयाच्या वेळी, 16 एप्रिल रोजी पौर्णिमा प्राप्त होत आहे, म्हणून 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल.