Gokarni flower benefits : नवी दिल्ली : पैशाची (money) कमतरता अनेकदा भेडसावत असते. पैशांच्या या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या आणि उपाय योजले जातात. बऱ्याच वेळा पैशाची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरतात. वास्तविक, पैशाची कमतरता दूर करण्यासाठी अपराजिता(गोकर्णी) फुलांच्या युक्त्या खास आहेत.
ज्यांना आर्थिक चणचण भासत असेल त्यांनी सोमवारी किंवा शनिवारी नदीत अपराजिताची 3 फुले वाहून वाहल्यास त्यांची आर्थिक उन्नती होते. ही युक्ती सतत तीन आठवडे करावी.
मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी अपराजिताच्या पाच फुलांसह तुरटीचे पाच तुकडे अर्पण करा. दुसऱ्या दिवशी अपराजिताचे फूल पर्समध्ये ठेवा. मुलाखतीला जाण्यापूर्वी ते सोबत ठेवा, असे केल्याने यश मिळेल.
शनिवारी शनिदेवाला निळ्या अपराजिता (गोकर्णी)च्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनी देवाला ही फुले अर्पण केल्याने आयुष्यात येणारे संकटे संपतात. याशिवाय जीवनात प्रगती आणि सुख-शांतीसाठी सोमवारी शिवलिंगावर निळे किंवा पांढरे अपराजितेची फुले अर्पण करावीत.
विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर पाच अपराजितांची फुले एका निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाकावीत. जमीन खोदताना लाकडी काड्या वापरा. या युक्तीने विवाह किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या अपराजिताची हार करून देवी, भगवान विष्णू आणि शिव यांना अर्पण करा. असे केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो.