Good Luck Mantra: घरातून बाहेर पडताना या चमत्कारी मंत्राचा नक्की करा जप... संकटातून मिळेल मुक्ती अन् होईल भरभराट

Good Luck Mantra in Marathi: ज्योतिषशास्त्रात अशा काही मंत्रांबाबत सांगण्यात आले आहे ज्यामुळे आयुष्यातील सर्व अडथळे, समस्या दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. घरातून बाहेर पडताना या मंत्राचा जप करा. 

Representative Image
(प्रातिनिधिक फोटो) Good Luck Mantra: घरातून बाहेर पडताना या चमत्कारी मंत्राचा नक्की करा जप... संकटातून मिळेल मुक्ती अन् होईल भरभराट 
थोडं पण कामाचं
  • मंत्रांचा जप केल्याने रखडलेले काम मार्गी लागतात आणि भरभराट होते अशी मान्यता आहे
  • नियमित मंत्राचा जप केल्याने संकटे दूर होत असल्याची मान्यता
  • मंत्राचा जप केल्याने सकारात्मकता पसरते

Success Mantra in Marathi: हिंदू धर्मात पूजा-पाठ याच्यासोबतच मंत्रांचा जप करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्या घरात नियमितपणे मंत्रांचा जप करण्यात येतो त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते. तसेच आयुष्यात सुख-समृद्धी येते. अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रांमध्ये मंत्र सांगण्यात आले आहेत. नियमानुसार या मंत्रांचा जप केल्यास कोणत्याही व्यक्तीचे भाग्य उजळते, त्याच्यावरील संकटे दूर होतात. शास्त्रात सांगण्यात आले आहे की, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना तुम्ही काही मंत्रांचा जप केल्यास तुम्हाला यश नक्की मिळते. (good luck mantra in marathi chant daily for success and prosperity)

हे पण वाचा : थंडीत लवकर उठायचेय? मग या वापरा टिप्स

घरातून बाहेर पडताना या मंत्राचा करा जप
|| श्री गणेशाय नम: ||

श्री गणेशाची पूजा सर्वप्रथम करण्यात येते. त्यामुळेच त्यांना प्रथमपूज्य देव असे म्हणतात. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी 'श्री गणेशाय नम:' मंत्राचा जप करा. या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा जप केल्याने आपल्यावरील संकटे दूर होतात आणि प्रत्येक कार्यात यश मिळते.

हे पण वाचा : तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स

ॐ ऐं श्रीं भाग्योदयं कुरु कुरु श्रीं ऐं फट् ||
या मंत्राचा जप केल्याने आयुष्यात सकारात्मकता येते आणि सुख-शांती कायम राहते. या मंत्राचा जप केल्याने आयुष्यातील सर्व संकटांपासून मुक्ती सुद्धा मिळते. तसेच त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तुम्हाला जर एखाद्या कामात यश मिळत नसेल तर या मंत्राचा 11 वेळा जप करा.

हे पण वाचा : टाचांना पडलेल्या भेगा या उपायांनी झटक्यात होतील दूर

राम लक्ष्मणौ सीता च सुग्रीवों हनुमान कपि | 
पञ्चैतान स्मरतौ नित्यं महाबाधा प्रमुच्यते || 

हा मंत्र भगवान श्रीराम यांना समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने सर्व कार्य यशस्वी होतात. तसेच प्रत्येक कार्यात येणारे अडथळे दूर होतात. जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी या मंत्राचा जप नक्की करा.  

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी