Gudi Padwa 2022: यंदा या दिवशी आहे गुढीपाडवा; जाणून घ्या या सणाची काही खास वैशिष्ट्ये

आध्यात्म
Updated Mar 30, 2022 | 10:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gudi Padwa Celebration 2022 | चैत्र शुध्द प्रतिपदेपासून म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व हिंदू संस्कृतीनुसार खूप आहे, या दिवसापासूनच हिंदू नववर्षाची सुरूवात होत असते. लक्षणीय बाब म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. पाडव्याच्या दिवशीच अनेक मंडळी आपल्या जीवनातील नवीन गोष्टींचा आरंभ करण्यास सुरूवात करत असतात.

Gudi Padwa 2022 This year Gudi Padwa is on 2nd April 2022
...म्हणून गुढीपाडवा साजरा करतात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
  • यंदा हा सण शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे.
  • चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदा होय.

Gudi Padwa Celebration 2022 | मुंबई : चैत्र शुध्द प्रतिपदेपासून म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व हिंदू संस्कृतीनुसार खूप आहे, या दिवसापासूनच हिंदू नववर्षाची सुरूवात होत असते. लक्षणीय बाब म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. पाडव्याच्या दिवशीच अनेक मंडळी आपल्या जीवनातील नवीन गोष्टींचा आरंभ करण्यास सुरूवात करत असतात. यंदा हा सण शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवचैतन्याची गुडी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदा होय. (Gudi Padwa 2022 This year Gudi Padwa is on 2nd April 2022). 

अधिक वाचा : नाणार प्रकल्प रत्नागिरीतच पण..., सीएमचं थेट पीएमला पत्र

गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण

गुढीपाडवा हा सण म्हणजे हिंदू धर्माला लाभलेली एक परंपरा आहे. हा सण साजरा करण्याचे देखील प्रमुख कारण आहे. याचा इतिहास शालिवाहन राजवटीशी संबंधित आहे. शालिवाहन राजाने  शालिवाहन शकास सुरूवात केली आणि या शकाची सुरूवात म्हणजेच गुढीपाडवा होय. महत्त्वाचे म्हणजे शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी काही भांगात शोभायात्रा काढून, पंचागाचे वाचन करून किंवा सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. तसेच गुढीपाडवा सण साजरा करण्याची आणखी एक कारण महाभारताशी संबंधित असल्याचे बोलले जाते. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. तो दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा हा सण सादरा करतात असे मानले जाते. 

अधिक वाचा : संजय राऊत अन् वरुण गांधींच्या डिनरमुळे भाजपच्या गोटात गडबडी

गुढी कशी सजवतात? 

खरं तर प्रत्येक भागांत गुढी सजवण्याची पद्धत वेगळी असते. पण प्रामुख्याने सर्व भागांतील गुढीमध्ये एक समान पद्धत दिसून येते ती म्हणजेच गुढीला गुंडाळलेली साडी. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका उंच काठीला रेशमी साडी घेऊन तिची घडी बांधली जाते. नंतर त्या काठीवर चांदीचा किंवा अन्य धातूचा तांब्या उपडा करून ठेवला जातो. आंब्याची पाने व कडूनिंबाची डळाळी बांधून गुढी अधिक सुंदर सजवली जाते. सोबतच गुढीला फुलांचा हार आणि गाठीची माळ चढवली जाते. लक्षणीय बाब म्हणजे अलीकडे महाराष्ट्रातील काही भागांत गुढीला साडी न बांधता हिंदू धर्माचे प्रतिक असलेला भगवा झेंडा बांधला जातो. 

अधिक वाचा : Tax संबंधित बदलेल्या नियमामुळे तुमच्या खिशावरही होणार परिणाम

विधिवत पूजा कशी करावी?

अनेकांच्या मनात या दिवशी आपल्या गुढीची पूजा कशी करावी याबाबत संभ्रम असतो. चला तर म जाणून घेऊया गुढीची विधिवत पूजा कशी करावी? प्रामुख्याने सूर्योदयापूर्वी गुडी उभारली जाते, या शुभ दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच घरातील सर्व देव-देवतांचे पूजन झाल्यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दरवाजाला फुलांनी सजवले जाते. दाराबाहेर रांगोळी काढून दिवे लावावेत. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी, ग्रामीण भागात त्या जागेला गायीच्या शेणाने सारवले जाते. प्रामुख्याने गुढी पाठावर उभी केली जाते. नंतर गुढी उतरवताना सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी गुढी उतरवली जाते. 

भारतातील विविध राज्यातील गुढीपाडवा

गुढीपाडवा हा खरं तर हिंदूचा सण आहे, मात्र हा साजरा करण्याचे प्रमाण भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. कारण याच दिवशी मराठी नववर्षाची देखील सुरूवात होत असते. महाराष्ट्रात हा सण अधिक साजरा होत असला तरी भारतातील विविध भागांत देखील हा सण साजरा केला जातो. मात्र इतर राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आणि नाव वेगळे असते. आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये याच दिवशी उगादी नावाने सण साजरा केला जातो. तसेच नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत आनंदाने दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. 


 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी