These Zodiac signs will be rich in Gudi padwa 2023: गुढीपाडवा (Gudi Padwa) हा मराठी वर्षातील पहिला सण. गुढी पाडव्याला साडीतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे. यादिवशी विविध प्रतीकांनी ही गुढी सजवली जाते. चांगल्या कामासाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण या दिवशी गृहप्रवेश, वस्तू खरेदी किंवा असे अनेक शुभ कार्य करतात. (Gudi Padwa 2023 : These three zodiac signs will be rich in Gudipadwa, know which zodiac signs are lucky)
अधिक वाचा : तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे फळांचा राजा
या मुहूर्तावरती कोणतेही चांगली खरेदी केलेली वस्तू अथवा कोणतेही चांगले काम सुरू केले तर ते दीर्घायू टिकून राहते. यामुळे या मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. या गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचा आपल्या राशींवरही तितकाच सकारात्मक परिणाम पडतो. यावर्षी गुढी पाडवा कोणत्या राशीसाठी फलदायक असणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पुराणात गुढीपाडव्याची एक आख्यायिका आहे. ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते. पुराणातील अजून एक आख्यायिका आहे. रामायण काळामध्ये प्रभू श्री राम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याकडे आले होते. त्यावेळेस अयोध्यावासीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते. अशा या गुढीपाडव्याबद्दल पुराणामध्ये या दोन आख्यायिका आहेत.
अधिक वाचा : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल
यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण येत असून सकाळी 6.29 ते 7. 39 या मुहूर्तावरती सर्वांनी गुढी उभारावी. ही गुढी आपल्या घराकडे तोंड करून उभरावी. या गुढीवरती तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरगाठ बांधलेली असावी. दरम्यान यंदाचा गुढीपाडवा हा सण तीन राशींसाठी भारी असणार आहे. या खालील तीन राशींसाठी यंदाचा गुढी पाडवा आर्थिकदृष्ट्या भरभराटीचा असणार आहे. चला तर जाणून घेऊया.
अधिक वाचा : black coffee वजन कमी करण्यास खरोखर आहे का उपयुक्त?
धनु राशींसाठी मराठी नवीन वर्ष उत्तम असणार आहे. नवीन वर्षात धनु राशीला सुख आणि समृद्धी आणि भरपूर धन मिळणार. व्यवहारात फायदा होणार. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार. अपेक्षित फळ आणि प्रसिद्धी मिळेल. पगारात वाढ होणार. कुटूंबांसोबत वेळ घालवाल.
सिंह राशीसाठी यंदाचा गुढी पावडा फलदायक असणार आहे. या राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव नाही. संपत्तीत भरभराट होणार. हाती घेतलेले काम पुर्ण कराल. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल. लोकांकडून भरभरुन प्रेम मिळेल. व्यवसायात नफा होणार.
अधिक वाचा : Daily Horoscope:जाणून घ्या मंगळवारचं राशीभविष्य, कोणा-कोणाला मिळेल धनलाभ
मिथून राशीसाठी यंदाचा गुढी पाडवा राजयोग असणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होणार. गुढी पाडवा आनंदाचा जाणार. नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे.