Gudi Padwa Shubh Muhurat 2022 : गुढीपाडवा का केला जातो साजरा, जाणून घ्या महत्त्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी २ एप्रिल २०२२ ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.

gudi padwa shubh muhurat 2022 in marathi panchang importance and significance
Gudi Padwa 2022 : गुढीपाडवा का केला जातो साजरा, जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते
  • गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जातो
  • गुढी पाडव्याच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो

Gudi Padwa Shubh Muhurat 2022 in Marathi । मुंबई :  हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी २ एप्रिल २०२२ ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.  पण हा सण का साजरा केला जातो ?  या सण कसा साजरा करावा, काय पूजा विधी असते, यंदाचा शुभू मुहूर्त काय आहे, याची माहिती आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. 

का साजरा केला जातो गुढीपाडवा 

मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा घालतात. कडुनिंबाची दहाळी आणि आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी आणि फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात.

शालिवाहन हा मराठी राजा 

पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. या शकाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा होय. यादिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती पूजन केले जाते म्हणून नववर्ष प्रारंभाचा हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो. 

अधिक वाचा :  गुढीपाडव्याला घराच्या अंगणात किंवा मंदिरात काढा स्पेशल रांगोळी, पहा डिझाइन्स

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते. हीच परंपरा कायम ठेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो अशी देखील मान्यता आहे.

अधिक वाचा :  यंदा या दिवशी आहे गुढीपाडवा; जाणून घ्या या सणाची काही खास वैशिष्ट्ये

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सुर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवले जाते.

गुढीपाडवा मुहूर्त २०२२

फाल्गुन अमावस्या शुक्रवार १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी संपणार आहे. तेव्हा अमावस्या संपल्या लगेच नंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवार २ एप्रिल २०२२ च्या रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रतिपदा राहील. तिथीनुसार हा उत्सव २ तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.

गुढीपाडव्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पुजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पुजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.


गुढी पाडव्याची पूजा पद्धत

1. गुढी पाडव्याचे अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केले जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे.
2. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं.
3. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावले जाते.
4. नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात.
5. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी