Ashadh Month 2022: आषाढ महिन्यात येतेय हलहारिणी अमावस्या, या दिवशी करा हे उपाय होईल धन लाभ

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jun 16, 2022 | 10:46 IST

अमावस्या हा दिवस पितरांची पूजा आणि तर्पण तसेच आणि श्राद्ध करण्यासाठी खूप चांगला मुहूर्त असतो. अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते. परंतु आषाढची अमावस्या ही तिथी शेतकऱ्यांसाठी खास असते. पितरांची पूजा तर केलीच जाते याशिवाय शेतकरी बांधव या दिवशी नांगराची आणि शेतीत वापरल्या जाणार्‍या उपकरणांची पूजा करतात. चांगले उत्पन्न मिळावे यासाठी देवाकडे या दिवशी प्रार्थना केली जाते,

 Ashadhs new moon important for the farmers
आषाढ महिन्यातील 'ही' अमावस्या शेतकऱ्यांसाठीही आहे महत्त्वाची  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • या दिवशी शेतकरी नांगराची आणि शेतीत वापरल्या जाणार्‍या उपकरणांची पूजा करतात.
 • आषाढ अमावस्या 28 जून रोजी पहाटे 5:53 वाजता सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8:23 वाजता समाप्त होईल.
 • शेतीचे उत्पादन वाढल्याने जीवनातील आर्थिक समस्या संपुष्टात येतील

Halharini Amavasya 2022 in Ashadh Month: अमावस्या हा दिवस पितरांची पूजा आणि तर्पण तसेच आणि श्राद्ध करण्यासाठी खूप चांगला मुहूर्त असतो. अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते. परंतु आषाढची अमावस्या ही तिथी शेतकऱ्यांसाठी खास असते. पितरांची पूजा तर केलीच जाते याशिवाय शेतकरी बांधव या दिवशी नांगराची आणि शेतीत वापरल्या जाणार्‍या उपकरणांची पूजा करतात.

चांगले उत्पन्न मिळावे यासाठी देवाकडे या दिवशी प्रार्थना केली जाते, म्हणूनच आषाढच्या अमावस्येला हलाहरी अमावस्या असेही म्हणतात. यावेळी आषाढ अमावस्या 28 जून रोजी पहाटे 5:53 वाजता सुरू होईल आणि 29 जून रोजी सकाळी 8:23 वाजता समाप्त होईल. या दिवशी हे निश्चित उपाय केल्यास धनप्राप्ती होईल. सुख समृद्धी वाढेल. शेतीचे उत्पादन वाढल्याने जीवनातील आर्थिक समस्या संपुष्टात येतील. यासोबत या दिवशी तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला अधिक फायदा होईल. 

आषाढ अमावस्येला निश्चित करा हे उपाय 

 • या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला. असे केल्याने तुमची पापे नष्ट होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. 
 • सकाळी आंघोळ केल्यावर पिठाचे गोळे बनवा. त्यानंतर या गोळ्या जवळच्या तलावात किंवा नदीवर जाऊन माशांना खाऊ घाला, असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील असा विश्वास आहे. 
 • काल सर्प दोष निवारणासाठी चांदीच्या नागाची पूजा करून पांढऱ्या फुले अर्पण करा त्यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करा, असे केल्यानं सर्पकाळ या  दोषातून तुमची सुटका होईल.
 • अमावस्येच्या दिवशी पंडिताकडून शिवाची पूजा करून हवन करा. यामुळे काल सर्प दोषापासून सुटका होईल.
 • संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या ईशान्य दिशेला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुपात थोडे केशर टाका. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. 
 • शत्रूंचा पराभव करण्यासाठी अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेलाने भरलेली रोटी खायला द्या. जर कुत्र्याने त्याच वेळी रोटी खाल्ली तर त्या वेळेपासून शत्रू शांत होऊ लागतात.
 • आषाढ अमावस्येला सूर्य, भगवान शिव, माता गौरी आणि तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा करावी.

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की टाइम्स नाऊ कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी