Hanuman Aarti Lyrics in marathi : म्हणा हनुमानाची आरती, मारुतीरायाला प्रसन्न करा

Hanuman ji ki Aarti Lyrics in marathi: म्हणा हनुमानाची आरती मारुतीरायाला प्रसन्न करा

Hanuman Aarti
हनुमानाची आरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • म्हणा हनुमानाची आरती मारुतीरायाला प्रसन्न करा
  • हनुमानाची आरती : 1
  • हनुमानाची आरती : 2

Hanuman Aarti हनुमानाची आरती : 1

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। 1 ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। 2 ।।

Hanuman Aarti हनुमानाची आरती : 2

जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु ॥
वानरूपधारी । ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय ॥ 1 ॥
सीतेच्या शोधासाठीं । रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय ॥ 2 ॥
सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले । मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी । तवं केले दहन ॥ जय ॥ 3 ॥
निजबळे इंद्रजित । होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला । लघुशंका करून ॥
देखोनी पळताती । महाभूते दारुण ॥ जय ॥ 4 ॥
राम हो लक्षुमण । जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजि मर्दिले ॥ जय ॥ 5 ॥
देउनी भुभुःकार । नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा । त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी । अयोध्येसी आणिले ॥ जय ॥ 6 ॥
हनुमंत नाम तुझे । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी । हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी । मुक्त झाले संसारा ॥ जय ॥ 7 ॥

एक प्रभावी औषध आहे मध

निरोगी हृदयासाठी रमझानमध्ये खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी