Hanuman Jayanti 2023 puja vidhi: हनुमान जयंतीला अशी करा मारुतीरायाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि नियम

आध्यात्म
भरत जाधव
Updated Apr 06, 2023 | 10:18 IST

Hanuman Jayanti 2023 Puja Vidhi in marathi: सनातन परंपरेनुसार पवनपुत्र हनुमानाची उपसाना केल्याने माणसाची सर्व संकटं दूर होत असतात. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.

How to worship Hanuman; Know Muhurat, Importance, Rules
हनुमानाची कशी कराल पूजा; जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व,नियम  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हनुमान जंयतीच्या वेळी मारुतीरायाची पूजा केली जाते.
  • घरात हनुमानाची कशी करायची पूजा आणि काय आहे शुभ मुहूर्त.
  • चैत्र पोर्णिमा 5 एप्रिल रोजी बुधवारी सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल.

Hanuman Jayanti 2023 puja vidhi: सनातन परंपरेनुसार पवनपुत्र हनुमानाची उपसाना केल्याने माणसाची सर्व संकटं दूर होत असतात. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतांनुसार हनुमान हे महादेवाचा रुद्रावतार आहे. (Hanuman Jayanti 2023: Puja Vidhi , Puja Time, History, Rituals, Significance, Vrat Katha, Samagri in marathi)

अधिक वाचा  : मुलांनो! मामाच्या गावाला जाण्याचा प्लान करा Ready

 दरम्यान हनुमान जयंतीच्या वेळी मारुतीची पूजा केल्यानं त्याला त्याच्या जीवनात सुख-समुद्धी मिळते.  योग्य पद्धतीने पूजा-अर्चा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील समस्या ह्या चुटकी मारल्याप्रमाणे गायब होत असतात. तसेच त्यांची इच्छा लगेच पूर्ण होत असते. यामुळे हनुमान जंयतीच्या वेळी मारुतीरायाची पूजा केली जाते.चला जाणून घेऊ हनुमान जयंतीचं महत्व. घरात हनुमानाची कशी करायची पूजा आणि काय आहे शुभ मुहूर्त

अधिक वाचा  : Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...;

हनुमान जयंतीची तारीख 
 

पंचागनुसार हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र पोर्णिमा 5 एप्रिल रोजी बुधवारी सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल. तर 6 एप्रिलला 10 वाजून 4 मिनिटांनी ही पोर्णिमा संपेल. याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. 

अधिक वाचा  : छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना करा वंदन

हनुमान जयंतीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त
 

हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून  6 मिनिटांपासून ते 7 वातून 40 मिनिटापर्यंत असेल. त्यानंतर दुपारी 12 वाजून 24 मिनीट ते 1 वाजून 58 मिनिटांपर्यंत हनुमानाची पूजा केली जाऊ शकते. तसेच सायंकाळी 5 वाजून 7 मिनीट ते 8 वाजून 7 मिनिटांपर्यंत पूजेसाठी शुभ मुर्हतू आहे. 

अधिक वाचा  :  फक्त एका महिन्यात कमी होईल 5 किलो वजन

हनुमानाची पूजा कशी करणार 
 

 हनुमानजी की पूजा करने के लिए बजरंगबली को लाल पुष्प, सिंदूर, अक्षत्, पान का बीड़ा, मोतीचूर के लड्डू, लाल लंगोट और तुलसी दल अर्पित करें। हनुमानाची पूजा करण्यासाठी लाल फूल, शेंदूर, पानाचा विडा, मोतीचूरचे लाडू, लाल लंगोट, अरप्ण करावी. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. हनुमानची आरती करावी. नैवैद्य म्हणून हनुमानाला लाडू, हलवा, आणि केळी द्यावीत. तर या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाणचं पाठ केल्याने देखीव  विशेष लाभ मिळत असतात.  

अधिक वाचा  :  त्वचेसाठी टोमॉटो आहे फायदेशीर आहे, चेहरा होईल चमकदार

भगवान हनुमानाच्या पूजाचे नियम 

  • हनुमानाची उपासना करताना आपण स्वच्छ कपडे परिधान करणं आवश्यक आहे. पूजा करताना उत्तर किंवा पूर्वकडे आपला चेहरा असावा. 
  • हनुमानाच्या प्रतिमेची फोटो किंवा मूर्तीची पूजा करावी. 
  • ध्यान करणाऱ्या हनुमानाची पूजा करावी, जेणेकरुन आपल्या मनाला शांती मिळेल. 
  • जीवनातील संकटे दूर करायची असतील तर डोंगर हातावर उचलेल्या हनुमानाची पूजा करावी. 
  • छातीतून रामाचा फोटो दाखवणारा हनुमान किंवा लंका दहन करणाऱ्या हनुमानाची पूजा कधीच करू नये. 
  • हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्यचं पालन करावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी