Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीला करा १२ राशींनी हे महत्त्वाचे उपाय, बजरंगबलींचा राहील आशीर्वाद 

Hanuman Jayanti 2022 । यंदा हनुमान जयंती १६ एप्रिलला रविवारच्या दिवशी आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. त्रेतायुगात भगवान श्रीरामांना मदत करण्यासाठी भगवान शिवाच्या रुद्रावताराने प्रभू हनुमान प्रकट झाले होते.

Hanuman Jayanti do this important solution on Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला करा हे महत्त्वाचे उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यंदा हनुमान जयंती १६ एप्रिलला रविवारच्या दिवशी आहे.
  • दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.
  • बजरंगबलींच्या वडिलांचे नाव केसरी आणि आईचे नाव अंजना आहे.

Hanuman Jayanti 2022 । मुंबई : यंदा हनुमान जयंती १६ एप्रिलला रविवारच्या दिवशी आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. त्रेतायुगात भगवान श्रीरामांना मदत करण्यासाठी भगवान शिवाच्या रुद्रावताराने प्रभू हनुमान प्रकट झाले होते. बजरंगबलींच्या वडिलांचे नाव केसरी आणि आईचे नाव अंजना आहे. मंगळवारी जन्मलेल्या हनुमानजींच्या नावाशी वायुदेवाचे नाव देखील जोडलेले आहे, म्हणून त्यांना पवनपुत्र असेही म्हणतात. लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी हनुमान जयंतीला तुम्ही तुमच्या राशीनुसार भोग अर्पण करून बजरंगबलीला प्रसन्न करू शकता. त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख, यश आणि प्रगती मिळेल. (do this important solution on Hanuman Jayanti)

अधिक वाचा : तर कर्मचार्‍यांवर कारवाई होणार - अनिल परब

 बजरंगबलीला असा भोग अर्पण करा

मेष - या राशीच्या लोकांनी हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत. यामुळे बजरंगबली खूप प्रसन्न होतील. 

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला तुळशीचे बीज अर्पण करावे, असे केल्यास तुमची इच्छा पूर्ण होईल. 

मिथुन -  हनुमान जयंतीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी तुळशीची पाने अर्पण करावीत.

कर्क - हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्क राशीतील लोकांनी गाईच्या तुपात बेसनाची खीर बनवून पूजेच्या वेळी अर्पण करावी. तेव्हा बजरंगबली प्रसन्न होतील.

अधिक वाचा : महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन...

सिंह - सूर्य सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे आणि हनुमानजी सूर्य देवाचे शिष्य आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीला बजरंगबलीला जिलेबी अर्पण केल्यास फलदायी ठरेल. 

कन्या - या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बजरंगबलीला चांदीचा अर्क अर्पण करावा.

तूळ - तूळ राशीच्या लोकांनी हनुमानजींना मोतीचूर म्हणजेच बुंदीचे लाडू अर्पण करावेत.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत. तसेच गाईच्या तुपात बेसनाचे लाडू बनवून घरीच अर्पण करावे.

धनु - हनुमान जयंतीच्या दिवशी धनु राशीतील लोकांनी बजरंगबलीला लाडू आणि तुळशीती पाने अर्पण करावीत. 

मकर - मकर राशीतील लोकांनी हनुमानजींना मोतीचूर अर्थात बुंदीचे लाडू अर्पण करायला हवेत, असे केल्यास तुमची मनोकामना पूर्ण होईल. 

कुंभ - हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर भरावा आणि लाडू अर्पण करा.

मीन - मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला पवनपुत्र लवंग अर्पण करावी, यामुळे बजरंगबली प्रसन्न होतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी