Happy Akshay Tritiya 2022 Wishes in marathi : अक्षय्य तृतीया निमित्त शेअर करा मराठमोळे मेसेज

Happy Akshay Tritiya 2022 Messages in marathi : अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Messages, Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.

happy akshay tritiya 2022 in marathi wishes messages images wallpapers whatsapp status to send via social media for your loved ones
अक्षय्य तृतीया निमित्त शेअर करा मराठमोळे मेसेज 
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला सूर्य आणि चंद्र यांचा मोठा प्रभाव असतो. जेव्हा सूर्याची प्रखरता जास्त असते.
  •  तेव्हा हिंदू कँलेंडरनुसार अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत पावन आणि मंगलमय  मानली जाते.
  • या शुभ तारखेला अक्षय तृतीया किंवा आखा तीज किंवा उत्तर महाराष्ट्रात आखाजी असे म्हणतात.

Happy Akshay Tritiya 2022 Status in marathi  : दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला सूर्य आणि चंद्र यांचा मोठा प्रभाव असतो. जेव्हा सूर्याची प्रखरता जास्त असते.  तेव्हा हिंदू कँलेंडरनुसार अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत पावन आणि मंगलमय  मानली जाते. या शुभ तारखेला अक्षय तृतीया किंवा आखा तीज किंवा उत्तर महाराष्ट्रात आखाजी असे म्हणतात. यावर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीया साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात. अनेक जण सोन्याची खरेदी करतात. तसेच नवीन वस्तू जसे वाहन खरेदी, घर खरेदी या सारख्या गोष्टींची खरेदी केली जाते. 

अक्षय तृतीयेला म्हणजे आखाजीला सोने विकत घेण्याची परंपरा आहे. या दिवशी सोने खरेदी केल्याने ते अक्षय होते असा समज आहे.  या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते अशी मान्यता आहे.  अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे. ज्या दिवशी कोणत्याही मंगलमय कार्यासाठी तसेच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पंचांग पाहण्यासाठी शुभ मुहूर्त काढण्याची गरज नसते. अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Messages, Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!.

Happy Akshay Tritiya 2022 Wishes
ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला

नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो

हीच आमची कामना

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Akshay Tritiya 2022 Wishes 1

आपणास व आपल्या कुटुंबास

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Akshay Tritiya 2022 Wishes 2

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,

सुख, समाधान घेऊन येवो..

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

Happy Akshay Tritiya 2022 Wishes 3

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,

तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो,

अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…!

Happy Akshay Tritiya 2022 Wishes 4

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,

लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..

शुभ अक्षय तृतीया !

दरम्यान, लग्न, गृहप्रवेश, घर खरेदी, वाहन खरेदी अशी शुभ कार्ये या तारखेला पंचांग न पाहता या दिवशी करता येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा पाठ आणि हवन इत्यादी कार्य करणं शुभ मानलं जातं. सर्वांना टाइम्स नाऊ मराठीकडून अक्षय तृतीया, आखाजी आणि आख तीजच्या हार्दिक शुभेच्छा. 

आणखी मेसेज 


दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…!!


तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय तृतीयाच्या  शुभेच्छा!

अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..को
रोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!

धन लक्ष्मी येवो घरी,
लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी
करुन सोन्याची खरेदी
करु अक्षय्य तृतीया साजरी
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर…
अक्षय्य तृतीया शुभेच्छा..!

अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा!

आजच्या या शुभ दिवशी
भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व
तुमच्या कुटुंबावर राहो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणपती बाप्पाचा वास असो,
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद
असो तुमच्या
जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!

मनाचा उघडा दरवाजा…
जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…
प्रेमाचा मधही विरघळू दे…
अक्षय्य तृतीया शुभेच्छा!

हृदयाला मिळो हृदय,
आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
अक्षय तृतीयेचा सण आहे,
आनंदाची गाणी गात राहा,
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी