Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes : गणेश चतुर्थीनिमित्त Facebook, Instagram WhatsApp, Twitter आणि Social media वर मराठीतून द्या शुभेच्छा

Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes : ३१ ऑगस्ट रोजी आपले लाडके गणराय भक्तांच्या भेटीला येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट दूर झाले नसले तरी कोरोनाचे संकट बर्‍यापैकी आटोक्यात आले आहे. तसेच यंदा सर्व सण कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. बुधवारी गणेश चतुर्थी असून लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहे.

ganesh chaturthi marathi wishes 2022
गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३१ ऑगस्ट रोजी आपले लाडके गणराय भक्तांच्या भेटीला येणार आहे.
  • यंदा सर्व सण कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार आहे.
  • त्यामुळे गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे.

Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes : मुंबई : ३१ ऑगस्ट रोजी आपले लाडके गणराय भक्तांच्या भेटीला येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट दूर झाले नसले तरी कोरोनाचे संकट बर्‍यापैकी आटोक्यात आले आहे. तसेच यंदा सर्व सण कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. बुधवारी गणेश चतुर्थी असून लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहे. गणेश चतुर्थीचा सण जसजसा जवळ येत आहे तसा गणपतीची तयारी पूर्ण होत आहे. आता मित्र मैत्रिणींच्या आंणि नातेवाईकांच्या घरी जाऊन तसेच मंडपात जाऊन गणरायचे दर्शन घ्यायचेच आहे. तसेच Facebook, Instagram WhatsApp, Twitter आणि Social media वरूनही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊया.  (ganesh chaturthi 2022 share marathi wishes to friends and farmily on Facebook, Instagram WhatsApp, Twitter and other Social media platform)

अधिक वाचा :  Ganesh Chaturthi 2022 : म्हणून गणपतीची झाली दोन लग्न, वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

                                                       Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes । Photo BCCL 

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

                                                       Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes । Photo BCCL 

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: मस्तकहीन गणेशाची केली जाते पूजा, केदारनाथजवळ आहे हे रहस्यमय बाप्पाचे मंदिर

बाप्पाच्या आगमनाला
सजली सर्व धरती 
नसानसात भरली स्फुर्ती 
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 

                                                       Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes । Photo BCCL 

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 

                                                       Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes । Photo BCCL 

Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' स्तोत्राचे पठण; सर्व दुःख होतील दूर, अशी करा सुरूवात

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

                                                       Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes । Photo BCCL 

Ganesh Chaturthi 2022 Ekdant Katha: गणपती बाप्पाला का म्हणतात एकदंत, जाणून घ्या या मागील कथा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी