Deep Puja 2022: दीप पुजेच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

आध्यात्म
रोहित गोळे
Updated Jul 28, 2022 | 14:37 IST

Deep Puja 2022: आषाढ अमावस्येलाचा दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. कारण की, आजच्या दिवशी दिव्याची आरास करुन सांग्रसंगीत पूजा केली जाते. यावेळी दिव्याची पूजा करुन जणू काही तेजाची आराधना करतात.

happy kartiki ekadashi 2022 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
दीप पुजेच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज (फोटो सौजन्य: pixabay) 
थोडं पण कामाचं
  • द्या दीप पूजेच्या खास शुभेच्छा
  • आषाढ अमावस्येच्या दिवशी केली जाते दीप पूजा
  • दिव्यांची आरास करुन दीप पूजा करावी

Deep Puja 2022 Wishes: मुंबई: आज (२८ जुलै २०२२) आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. श्रावण महिना उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी महाराष्ट्रात 'दीप अमावस्या' (Deep Amavasya) साजरी केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला 'आषाढ अमावस्या'  (Ashadhi Amavasya) म्हणतात. याच दिवशी दीप पूजन (Deep Puja 2020) केले जाते. त्यामुळे या अमावस्येला बरंच महत्त्व आहे. 

आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन तेज प्राप्त व्हावं असा संदेश देणाऱ्या दिव्याचे आजच्या दिवशी विशेष पूजन केले जाते. यामुळे या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. तसेच आपल्या घरातील लहान मुलगा अथवा मुलगी या दिवशी ओवाळले जाते.

अधिक वाचा: Rakshabandhan: भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, भावा-बहिणीमध्ये वाढेल प्रेम

काल (२७ जुलै २०२२) रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी आषाढ अमावस्येला सुरुवात झाली आहे. ही अमावस्या आज (२८ जुलै २०२२) रात्री ११ वाजून मिनिटांनी संपणार आहे. यासाठीच आज संध्याकाळच्या सुमारास आपल्याला दीप पूजन करता येईल. तिमिरातून तेजाकडे असा संदेश देणारा अशी दिव्याची ओळख आहे. आजच्या प्राप्त परिस्थितीत सगळ्यांनाच अशा प्रतिकात्मक दीप पूजनाची गरज आहे. त्यामुळे आजच्या दीप पूजनातून सर्वांना अंधकारमय परिस्थितीशी लढण्याचा बळ मिळो. 

सध्याच्या डिजिटल युगात आपल्याकडे प्रत्येक सणांच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे आता आपल्याला दीप पूजनाच्या देखील शुभेच्छा आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून मिळतील. अशावेळी आपण देखील आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना Whatsapp, facebook यांच्या माध्यमातून दीप पूजनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपण SMS, Images पाठवू शकता. 

अधिक वाचा: Aashadh Deep Amavasya 2022 Date, Time: आज आषाढ दीप अमावस्या; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, तिथी आणि वेळ

पाहा दीप पूजनाच्या शुभेच्छा, Whatsapp Messages

 (फोटो सौजन्य: Getty)

दिव्या दिव्या दिपत्कार 
कानी कुंडल मोतीहार

(फोटो सौजन्य: twitter)

दीप अमावस्येच्या शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: twitter)

दीप सूर्याग्निरूपस्त्वं
तेजस: तेज उत्तमम 
दीप पूजनाच्या शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: twitter)

दीप ज्योती: परब्रम्हा  
दीपज्योतीजनार्दन:|

(फोटो सौजन्य: twitter)

तिमिरातुनी तेजाकडे 
ने दीपदेवा जीवना||

दरम्यान, आषाढ अमावस्या संपताच २९ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. हा महिना सात्विक समजला जातो. त्यामुळे अनेकजण या संपूर्ण महिन्यात मांसाहार वर्ज्य करुन सात्विक आहार घेतात. तसेच या महिन्यात अनेक पूजा-विधी देखील पार पाडले जातात. म्हणूनच हिंदू धर्मात या महिन्याला धार्मिकदृष्ट्या बरंच महत्त्व आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी