Happy Sankashti Chaturthi wishes in marathi: कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण, देवतांमध्ये श्री गणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाते. तसेच श्री गणराय हे बुद्धीची देवता आहेत. ज्योतिषांच्या मते, संकष्टी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. एखाद्या संकटातून बाहेर निघण्याला संकष्टी म्हटले जाते. यामुळेच आयुष्यातील सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी भाविक गणेश चतुर्थीचं व्रत, उपवास करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10 वाजून 06 मिनिटांची आहे.
या संकष्ट चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाकांना आणि आप्तेष्टांना मराठीतून शुभेच्छा द्या. संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे असेच काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा..
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा