Vasu Baras 2021: वसुबारसनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Vasu Baras 2021: आजपासून (१ नोव्हेंबर) खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या आणि वसुबारसच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy vasu baras 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
Vasu Baras 2021: वसुबारसनिमित्त शुभेच्छा संदेश  
थोडं पण कामाचं
  • : यंदाच्या दिवाळीची (Diwali) सुरूवात ही आजपासूनच (१ नोव्हेंबर) झाली आहे
  • दिवाळीचा पहिला सण वसुबारस (Vasu Baras) आज साजरा करण्यात येत आहे.
  • आजच्याच दिवशी गाय आणि वासरु यांची सवत्स पूजा करुन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Vasu Baras 2021 whatsApp Marathi wishes and Messages: यंदाच्या दिवाळीची (Diwali) सुरूवात ही आजपासूनच (१ नोव्हेंबर) झाली आहे. कारण आज दिवाळीचा पहिला सण वसुबारस (Vasu Baras) आज साजरा करण्यात येत आहे. आजच्याच दिवशी गाय आणि वासरु यांची सवत्स पूजा करुन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसंच याशिवाय आजपासूनच घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. त्यामुळे आजपासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. यंदाही दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा सण साजरा करता येणार नाही. पण सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात आपण वसुबारसच्या शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकता.  (happy vasu baras 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)

कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते. ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे. वसुबारस हा त्याचाच भाग आहे.

दरवर्षी दिवाळीचा एक वेगळाच उत्साह सर्वत्र लोकांमध्ये दिसून येतो. मात्र,गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करण्यावर बंधने आली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण हा व्हायरस पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे. 

मात्र, असं असलं तरीही आपण आपल्या दिवाळीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Vasu Baras wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या वसुबारसच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. गाय आणि वासराची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते. ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे. 

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदू देत.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी असणारे सेंद्रिय नाते सुदृढ करणारा वसुबारस हा सण. या सणानिमित्ताने शुभेच्छा

वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी