Hartalika 2020 Shubh Muhurat: हरतालिका पूजेचे मुहूर्त आणि हरतालिकेचं महत्त्व जाणून घ्या

हरतालिका देशभरात उत्साहानं साजरा केला जाणारा सण आहे.यादिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारीका योग्य वर मिळावा यासाठी हरतालिकेचं व्रत करतात.तेव्हा जाणून घ्या २१ ऑगस्टला गुरूवारी साजरी होणार आहे.

Shiv-Parvati
जाणून घ्या हरतालिका पूजेचे मुहूर्त आणि हरतालिकेचं महत्त्व 

थोडं पण कामाचं

  • हरतालिका यंदा २१ ऑगस्ट २०२० ला म्हणजेच शुक्रवारी आहे.
  • हरतालिका शुक्रवारी आल्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे.
  • जाणून घ्या हरतालिकेच्या पूजेसाठी खास मुहूर्त

Hartalika Teej Vrat Shubh Muhurat २१ ऑगस्ट २०२० रोजी म्हणजेच आज (गुरूवार) देशात हरतालिका साजरी केली जात आहे. या व्रतामध्ये महिला देवी पार्वती आणि भगवान शंकराचं पूजन करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. याशिवाय कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात, या व्रताचं महत्त्व असं की, हे व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात. भाद्रपद शुक्ल तृतियेला म्हणजेच २१ ऑगस्टला हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी ६.१८ मिनीटांपासून तर रात्री १.५८ मिनीटांपर्यंत आहे. तर २२ ऑगस्टला सकाळी शिव-पार्वतीच्या रेतीच्या मूर्तीचं (पिंडीचं) विसर्जन करून आपण हे व्रत पूर्ण कराल.

अशी करावी पूजा

योग्य वर मिळावा म्हणून आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी व्रताचं उद्यापन करतात. यासोबतच रात्री सुद्धा शिव-पार्वतीची आरती केली जाते. सकाळी शूचिर्भूत होऊन महिला नदीकाठची रेती घेऊन येतात. त्या रेतीची पिंड बनवतात आणि त्यात ५ खडे गौरी म्हणून पूजेत ठेवतात. मग या शिव-गौरीची यथायोग्य पूजा केली जाते. यासाठी भगवान शंकराचे आवडते बिल्वपत्र आणि पांढरी फुलं पूजेत अवश्य असतात. याशिवाय माता पार्वती आणि शिवपिंडीला कापसाची वस्त्र अर्पण केली जातात आणि १६ झाडांची पत्री जी की १६-१६ पानं वाहिली जातात. यशासांग पूजा संपन्न झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते. यादिवशी महिला दिवसभर उपवास करतात. काही ठिकाणी पाणीही ग्रहण केलं जात नाही. यानंतर रात्री सुद्धा शिव-पार्वतीची आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी हरतालिकेला जाग्रण करतात आणि महिला खेळ खेळतात. यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी महिला आपलं व्रत पूर्ण करतात. पुन्हा एकदा पूजा करून आरती झाली की, महादेवाची पिंड आणि माता पार्वतीच्या रेतीच्या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं. अशाप्रकारे हरतालिकेचं व्रत पूर्ण होतं.

यावर्षी चंद्र कन्या राशीत आहे, सोबतच अमृत काळ बनणार आहे आणि सूर्य उत्तरा-फाल्गुणी नक्षत्र आणि सिद्धी योग बनवत आहे. यामुळे यंदा शुक्रवारी येणाऱ्या या हरतालिका पूजनाचं महत्त्व अधिक पटीनं वाढलेलं आहे, कारण शुक्रवारचा दिवस शुक्राचा असतो आणि शुक्र पती-पत्नीच्या प्रेमाचा कारक असा ग्रह आहे.

हरतालिकेची आख्यायिका

शास्त्रानुसार भगवान शंकराची पत्नी सतीच्या आत्मदहनानंतर सतीनं देवी पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला. तेव्हा पती म्हणून भगवान शंकराची प्राप्ती होण्यासाठी माता पार्वतीनं घोर तपश्चर्या केली आणि हरतालिकेचं व्रत केलं. माता पार्वतीच्या या व्रत आणि तपश्चर्येवर प्रसन्न होऊन, भगवान शंकरानं माता पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. तेव्हापासून हरतालिका व्रत कुमारीका आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून करतात. तर सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी