Astro: नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

आध्यात्म
Updated May 23, 2022 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips for Good Relationship: नवरा-बायकोमध्ये वाद होणे ही सामान्य बाब आहे मात्र ही भांडणे जर दररोज व्हायला लागली तर त्यासाठीचे उपाय करणे गरजेचे आहे. यामुळे नात्यात दरी निर्माण होऊ शकते. 

husband-wife
नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात नवरा-बायकोमध्ये प्रेम वाढवण्यासाठी, दाम्पत्य जीवन सुधारण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
  • चांगल्या दाम्पत्य जीवनासाठी कुंडलीमध्ये गुरू ग्रह शुभ स्थितीत असणे गरजेचे आहे.
  • भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जीवनात सुख-समृद्धी मिळवून देतात.

मुंबई: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको(husband-wife) एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये(relationship) गैरसमज निर्माण होतात. अशातच या कारणामुळे नवरा-बायकोमध्ये सतत भांडणे(quarrel) होऊ लागतात ज्यामुळे त्यांच्यातील नाते कमकुवत होऊ लागते. अनेकदा ही भांडणे नवरा-बायकोच्या नात्यात इतकी मोठी दरी निर्माण करतात की ती मिटवणे अशक्य होऊन जाते. अशातच ज्योतिषामधील काही प्रभावी उपाय केल्यास नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम-विश्वास वाढेल आणि तो मजबूत होण्यास मदत होईल.Here is the tips for good relationship 

अधिक वाचा - संभाजीराजे छत्रपतींनी नाकारली शिवसेनेची अट वाली ऑफर

नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम वाढवतील हे उपाय

ज्योतिषशास्त्रात नवरा-बायकोमध्ये प्रेम वाढवण्यासाठी, दाम्पत्य जीवन सुधारण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर हे उपाय केल्यास तुम्हाला काही काळातच फरक जाणवू लागेल. 

ज्योतिषशास्त्रानुसार नवरा-बायकोमध्ये दररोज भांडणे होऊ लागल्यास भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र बसून पुजा करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा. शिवचालिसा पठण करा आणि आपले नाते सुधारावे यासाठी प्रार्थना करा. 

चांगल्या दाम्पत्य जीवनासाठी कुंडलीमध्ये गुरू ग्रह शुभ स्थितीत असणे गरजेचे आहे. जर असे नसेल तर नात्यात मधुरता येत नाही सतत उतार-चढाव येतात. अशातच गुरूला मजबूत करण्यासाठी हळदीच्या ७ गाठ घ्या आणि ते पिवळ्या धाग्यात बांधा. त्यानंतर उजव्या हातावर ठेवून भगवान विष्णूचा मंत्र 'ॐ नमो भगवते वासुदेवाय'  या मंत्राचा कमीत कमी २१ वेळा जप करा. हा जप सात, अकरा अथवा एकवीस वेळाही करता येतो. त्यानंतर या गाठी मंदिरात जाऊन भगवान विष्णूला अर्पण करा. भगवान विष्णूकडे सुखद दाम्पत्य जीवनासाठी प्रार्थना करा. 

अधिक वाचा -कर कमी केल्यानंतरही महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जीवनात सुख-समृद्धी मिळवून देतात. सोबतच त्यांची एकत्र पुजा केल्याने, दर्शन केल्याने दाम्पत्य जीवन सुधारते. दर शुक्रवारी विष्णूजी आणि लक्ष्मीची पुजा करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी