महाशिवरात्रीत 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, शंकराची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी काय कराल?

आध्यात्म
Updated Mar 10, 2021 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

श्री शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा सण म्हणजेच महाशिवरात्री उद्या साजरी करण्यात येणार आहे. या मंदिरांमध्ये भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी लोकांचा महापूर पाहायला मिळतो.

How to celebrate Mahashivratri and what one should do and don't for lord Shiva's blessings
महाशिवरात्रीला ही घ्यावी काळजी  |  फोटो सौजन्य: फेसबुक

महाशिवरात्री २०२१: महादेव शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा सण म्हणजेच महाशिवरात्री उद्या साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व भारतभरातील शिवभक्त महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात. देशातील सर्व शिवमंदिरांमध्ये या दिवशी महादेवाची पूजा अर्चना केली जाते. या मंदिरांमध्ये भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी लोकांचा महापूर पाहायला मिळतो. महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकराची महानरात्र. अशी अख्यायिका आहे की या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि महादेव याच दिवशी शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. या दिवशी सर्व भक्त विविध व्रत करून विधिनुसार महादेवाची पूजा करतात आणि उपवास करून आपल्या आध्यात्मिक शक्तीला वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. 

या दिवशी व्रत केल्याने आणि शंकराची पूजा केल्याने महादेव इतर दिवसांपेक्षा जरा जास्त प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि आनंदी होऊन आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात. जर का तुम्हीही महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून  घेऊया की या वेळेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

या गोष्टी करायला हव्यात 

 • महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठावे आणि अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून त्याने अंघोळ करावी 
 • महादेवाच्या गोष्टी ऐकाव्या, त्यांचे भजन आणि भक्तीची गाणी म्हणावी आणि ऐकावी. महादेवाच्या मंत्रांचा जप करून त्याचे ध्यान करावे. 
 • घरात महादेवाची पूजा नक्की करा. यावेळी ओम नमःशिवाय चा जप केला पाहिजे. 
 • पूजेदरम्यान बेलाचे पान, पांढरे फूल, गंगाजल, भस्म,चंदन,दूध,धतुरा या वस्तु शिवलिंगावर अर्पित करायला हव्यात. 
 • दूधापासून बनलेल्या गोष्टी अर्पित करू शकता. 
 • या दिवशीच्या उपवासात दूध आणि फळांचा आहार करायला हवा. 
 • तुम्ही आजारी असाल किंवा तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तर मात्र त्यांना हा उपवास न करण्याचा सल्ला देण्यात येतो. 

या गोष्टी करणे टाळावे 

 • महादेवाची पूजा करत असताना कधीच तुळशीच्या पानाचा वापर करू नये. शिवपूजनात तुळस वर्ज्य आहे. 
 • असे म्हटले जाते की शंकराच्या पूजेत कधीच शंकही वाजवू नये.
 • महाशिवरात्रीला लवकर उठावे लागते त्यामुळे आदल्या रात्री लवकर झोपण्याचा सल्ला देण्यात येतो. 
 • या दिवशी मांसाहार करणे पाप आहे. त्यामुळे या दिवशी महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन सात्विक अन्न खाल्ले पाहिजे. 
 • महाशिवरात्रीच्या दिवशी कोणाशी खोटं बोलू नये आणि सर्वांवर दया करावी व भांडण करू नये. ही प्रेमाची रात्र असते. 
 • कोविड-१९ च्या महामारीच्या काळात कोण्याही गर्दीच्या ठिकाणी न जाता स्वगृहातच शिवाची भक्ती करा.
 • शिव पुराणानुसार शिवलिंगाच्या भोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. फक्त अर्धवर्तुळ फिरून परत आपल्या स्थानावर परत आलं पाहिजे. त्याने आपलं मनही आपल्या मूळ स्थितित येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी