Astro Tips:एका रात्रीत प्रसिद्ध व्हायचेय? या सोप्या उपायांनी होणार ग्रह प्रसन्न

आध्यात्म
Updated May 04, 2022 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astro Tips: प्रत्येक व्यक्तीवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाची कृपा असते. जर इतर ग्रहांनाही खुश करता आले तर जीवनात कोणत्याच समस्या येत नाहीत तसेच खूप वैभव-ऐश्वर्य मिळते. 

planets
एका रात्रीत प्रसिद्ध व्हायचेय? या सोप्या उपायांनी होणार ग्रह 
थोडं पण कामाचं
  • सूर्याची कृपा मिळवण्यासाठी व्यक्तीला तांब्याच्या भांड्यातून पाण्याचे सेवन केले पाहिजे
  • या ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हिरव्या रंगाची वस्त्रे धारण केली पाहिजेत
  • मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला पाहिजे

मुंबई: आज आयुष्यात यश, कीर्ती मिळवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहेत. मात्र सगळेच यात यशस्वी होतात असे नाही. यामागे ग्रहांची(planets) कमजोरी हे ही कारण असू शकते ज्यामुळे त्यांना फलप्राप्ती होत नाही. कोणतेही चांगले करिअर ग्रहाने पूर्ण निर्मित होत नाही तर इतर ग्रहांच साथ मिळाल्यास हे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक ग्रहाला प्रसन्न करणे गरजेचे असते. जाणून  घ्या ग्रहांना वस्त्र आणि काही सोप्या उपायांनी कसे खुश करता येईल. how to get blessings of all planets 

अधिक वाचा - 

असे करा ग्रहांना प्रसन्न

सूर्य - सूर्याची कृपा मिळवण्यासाठी व्यक्तीला तांब्याच्या भांड्यातून पाण्याचे सेवन केले पाहिजे. असेही मानले जाते की वेलचीच्या सेवनानेही सूर्यदेव प्रसन्न होतात. खिशात लाल रंगाचा रूमाल ठेवल्यानेही सूर्यदेवाची कृपा मिळवता येते. रविवारच्या दिवशी लाल वस्त्र धारण केल्याने सूर्य प्रसन्न होतात. 

चंद्र - क्रीम रंगाचे कपडे धारण करण्याने चंद्राचा शुभ प्रभाव वाडतो. तर चांदीच्या भांड्यांचा वापर केल्याने चंद्र देवाची कृपा होते. खिशात सफेद रंगाचा रुमालही ठेवा. 

मंगळ - मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला पाहिजे. लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने मंगळ प्रसन्न होतो. सोबतच खिशात लाल रंगाचा रूमाल ठेवला पाहिजे. डोक्यावर लाल टिका लावल्यानेही मंगळाची कृपा होते. 

बुध - या ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हिरव्या रंगाची वस्त्रे धारण केली पाहिजेत. यासोबतच खिशात हिरव्या रंगाचा रूमाल अथवा छोटा कपडा ठेवा. स्पोर्टी लूकमध्ये राहिल्यानेही बुध ग्रहाची कृपा होते. जर बुध प्रभावी असेल तर ती व्यक्ती बुद्धीच्या जोरावर आपल्या क्षेत्रात स्वत:ला स्थापित करू शकते. 

गुरू - गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण केली पाहिजेत. खिशात रूमालही पिवळ्या रंगाचा ठेवा. पिवळ्या फुलांची माळा घाला. लाभ होील. महिला पिवळ्या फुलांचा गजरा बनवू शकतात. केशर तसेच हळदीचा टिळा गुरूवारी लावला पाहिजे. 

शुक्र - दैत्य गुरू शुक्राचार्यची कृपा िळवण्यासाठी सिल्व्हर अथवा चमकणारी वस्त्रे या दिवशी घाला. सोबतच खिशात चांगल्या क्वालिटीचा चमकणारा सफेद रंगाचा रूमाल ठेवा. सफेद फुलांची माळ घाला. हिरे, प्लॅटिनम अथवा सफेद सोन्याचे दागिने घातल्याने शुक्राची कृपा होते. 

शनी - सूर्य पुत्र शनीला प्रसन्न करण्यााठी त्या व्यक्तीने निळ्या रंगाचे वस्त्र धारण केले पाहिजे. खिशात काळ्या रंगाचा रूमाल ठेवावा. सोबतच काळ्या रंगांच्या वस्तुचे दान करावे. एखाद्या गरिबाकडे चप्पल नसल्यास आपल्या पैशाने खरेदी करून द्यावे. 

अधिक वाचा - 

राहू - राहूला प्रसन्न करण्यासाठी ग्रे रंगाची वस्त्रे धारण करावीत. स्मोकी, भडक रंगाचे कपडे घातल्याने राहू प्रसन्न होतो. राहूला प्रसन्न करण्यासाठी कुत्र्यांची सेवाही करावी. 

केतु - विविध रंगाचे कपडे घातल्याने केतु प्रसन्न होतो. हाताच्या मनगटावर लाल रंगाचे कलावा धारण केले पाहिजे. धार्मिक चिन्ह शरीरावर असावे. 

डिसक्लेमर

(या लेखात दिलेली कोणतीही माहिती किंवा गणनेच्या सत्यतेचा आणि अचूकतेचा दावा केलेला नाही. वेगवेगळी माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, प्रवचने, मान्यता (श्रद्धा) आणि धर्मग्रंथांमधून संग्रहित करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी