Chanakya Niti : चारित्र्यहीन स्त्री कशी ओळखायची? चाणक्यांच्या मार्गांनी ओळखाल एका झटक्यात

आध्यात्म
भरत जाधव
Updated Sep 20, 2022 | 09:16 IST

 चाणक्य नीतिनुसार (Chanakya Niti ) स्त्रीला (woman) कोणीही समजू शकत नाही. भारतात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या देवीला (goddess) समाजाकडून (society) वेळोवेळी शिवीगाळ होते. निसर्गाने स्त्रीमध्ये कोमलता (tenderness), सौम्यता आणि आपुलकीचे गुण भरपूर प्रमाणात दिले आहेत. आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या चाणक्य नीतिमध्ये समाजाच्या विविध घटकांविषयी मार्गदर्शन केलं आहे.

How to identify a characterless woman?
Chanakya Niti : चारित्र्यहीन स्त्री कशी ओळखायची?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिला आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी काम करतात
  • चारित्र्यहिन महिला हृदय आणि जिभेचे संतुलन राखण्यास असमर्थ असतात.

Chanakya Niti :  चाणक्य नीतिनुसार (Chanakya Niti ) स्त्रीला (woman) कोणीही समजू शकत नाही. भारतात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या देवीला (goddess) समाजाकडून (society) वेळोवेळी शिवीगाळ होते. निसर्गाने स्त्रीमध्ये कोमलता (tenderness), सौम्यता आणि आपुलकीचे गुण भरपूर प्रमाणात दिले आहेत. आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या चाणक्य नीतिमध्ये समाजाच्या विविध घटकांविषयी मार्गदर्शन केलं आहे. नातेसंबंध, राजकारण, अर्थकारणाबाबतही त्यांनी चाणक्य नीतिमध्ये तत्व मांडले आहे. (How to identify a characterless woman? You will know the ways of Chanakya in a flash)

आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये स्त्रीगुणाविषयी भरपूर लिहिले आहे. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात चारित्र्यहीन स्त्रियांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जे लोक त्या गोष्टींचा विचार करतात आणि त्यांचे पालन करतात, त्यांच्या जीवनात कधीही दु:ख, कपट होणार नाही.  आचार्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथात अशा परिस्थितीबद्दल लिहिले आहे जे आजही आपल्या जीवनााला लागू होते. तसंच आचार्य चाणक्यांनी स्त्रियांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून तुम्ही कोणत्याही चारित्र्यहीन स्त्रीच्या प्रेमात पडणार नाही, तर चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्यानुसार चारित्र्यहीन स्त्रियांबद्दल-

Read Also : अभिनेता इमरान हाश्मीवर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक

हे सर्व गुण प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतात, पण हाताची पाचही बोटं सारखी नसतात असं म्हणतात, तशाच प्रकारे प्रत्येक स्त्रीने ममतेची मुर्ती असावी, याची गरजही नाही. आपला समाज महिलांना कुटुंबाचा सन्मान मानतो. कुटुंबाच्या सन्मानाला धक्का पोहोचू नये, ही जबाबदारीही स्त्रीवर टाकली जाते. 

चारित्र्यहीनतेमुळे संबंधित लोकांच्या जीवनावर परिणाम होतो

महिला आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी काम करतात. त्या त्यांचे नैतिक आणि सामाजिक आचरणही पवित्र ठेवत असतात. चाणक्याने सांगितले आहे की, स्त्री ही अत्यंत पूज्य आहे. आचार्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथात स्त्रीला देवीचा दर्जा दिला आहे. पण काही स्त्रिया अशा असतात ज्या त्यांच्या वाईट चारित्र्यामुळे आणि चारित्र्यहीनतेमुळे त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावर चुकीचा प्रभाव पाडत असतात. स्त्री चारित्र्यहिन असण्याने कुटुंबातील इतर लोकांवर वाईट परिणाम होत असतो. 

Read Also : आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, नवीन वेळापत्रक येणार

दरम्यान चारित्र्यहिन स्त्रियांना फक्त एकाच पुरुषावर प्रेम कसे करावे हे माहित नसते. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, या सर्व परिणाम बघता चारित्र्यहीन स्त्री कशी ओळखायची?  परंतु वाचकांनो काळजी नको चाणक्यांनी अशा स्त्रियांचा स्वभाव ओळखण्याची काही पद्धत सांगितल्या आहेत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही त्यांना सहज ओळख शकतात. 

चारित्र्यहीन स्त्रीची ओळख

काही चारित्र्यहिन स्त्रियांच्या आचरणामुळे कुटुंबाचा (कुटुंब) नाश होतो. या स्त्रियांना सामाजिक भाषेत अशुभ किंवा कुलक्षणी म्हणतात. अशा महिलांना योग्य जाणून घेतल्याशिवाय त्यांना ओळखता येत नाही.

वर्तनाचे निरीक्षण करून नैतिकता निश्चित केली जाऊ शकते

चाणक्यच्या मते, अशा प्रकारच्या महिलांपासून दूर राहिले पाहिजे, पण हे होण्यासाठी अशा स्त्रियांना आधी आपण ओळखलं पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, स्त्रियांचा चेहरा, आचरण, वागणूक पाहून त्यांच्या स्वभावाचा शोध घेतला जाऊ शकतो. या महिलांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अशी काही लक्षणे दिसतात, ज्यामुळे तिला एका बाजूने लक्ष्मीचा दर्जा मिळतो. तर दुसरीकडे अशा लक्षणांमुळे त्या अशुभ मानले जातात.

Read Also : सासरच्यांच्या टोमण्यांना वैतागलेल्या महिलेने रचला प्लॅन

चारित्र्यहीन स्त्रीची वैशिष्ट्ये

या महिला हृदय आणि जिभेचे संतुलन राखण्यास असमर्थ असतात. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आणि जिभेवर वेगळंच काहीतरी सुरू असतं. चारित्र्यहीन स्त्रियांना एकापेक्षा जास्त पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्याची लाज वाटत नाही. अशा महिलांना अनेक पुरुष मित्र असतात आणि ती सगळ्यांना तिच्या प्रेमाच्या सापळ्यात अडकवून ठेवते. या महिलांच्या हृदयात एक व्यक्ती असतो आणि ते दुसऱ्याच पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करत असतात. या स्त्रिया दुसऱ्यावर प्रेम व्यक्त करतात आणि दुसऱ्या पुरुषावर प्रेमसंग करत असतात. स्त्रिया अनेकदा लोकांना आकर्षित करत असतात. लोकांनी त्यांच्याकडे पाहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. चारित्र्यहीन स्त्रिया कोणत्याही एका पुरुषाच्या मालकीच्या नसतात. त्यांचा प्रियकर, त्यांचा जोडीदार त्यांच्या गरजेनुसार बदलत राहतात.

चारित्र्यहीन स्त्रीची ओळख

चाणक्य नीतीनुसार, चारित्र्यहीन स्त्रीच्या ओळखीची चिन्हे चाणक्य नीतीनुसार, ज्या महिलेच्या पायाची करंगळी पृथ्वीला स्पर्श करत नाही आणि अनामिका असलेले बोट (अंगठ्याजवळ असलेलं बोट) अंगठ्यापेक्षा जास्त लांब असते, अशा स्त्रिया परिस्थिती आणि परिस्थितीनुसार त्यांचे चारित्र्य बदलतात. या स्त्रिया सौभाग्यात असताना खूप रागीट असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं खूप अवघड असते. त्यांच्या चारित्र्यावरही विश्वास ठेवता येत नाही. 

ज्या स्त्रियांच्या पायाचा मागचा भाग हा खूप जाड असेल तर त्यांना अशुभ मानले जाते. याउलट पायाचा मागचा भाग खूप पातळ किंवा कोरडा असेल तर अशा महिलांना आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांना सामोरे जावे लागते. जर स्त्रीचे पोट घड्याळासारखे असेल तर ती स्त्री आयुष्यभर गरिबी आणि दारिद्र्यातून जाते. महिलांचे पोट लांब किंवा पॅड आहे, हे सर्व दुर्दैवाचे लक्षण आहे. ललाट किंवा कपाळ लांब असते, अशा महिला आपल्या भावजयांसाठी आणि दिरासाठी अशुभ असतात. ज्या महिलांचे पोट लांब असते, त्या सासरच्या लोकांसाठी अशुभ मानल्या जातात तसेच ज्यांची कंबर जाड असते त्या  त्यांच्या पतींसाठी अशुभ असतात.

पतीसाठी अशुभ मानले जातात या स्त्रिया

ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागात जास्त केस असतात, त्यांची उंची खूप असते, अशा महिलांना त्यांच्या पतींसाठी अशुभ मानले जाते. ज्या महिलांच्या कानात खूप केस असतात, त्यांचा आकार सारखा नसतो, अशा महिला घरातील दुःखाचे कारण बनतात. जाड लांब आणि रुंद दात जे बाहेर आल्यासारखे वाटतात, अशा स्त्रीच्या जीवनात नेहमीच दुःखाचे ढग असतात. ज्या महिलांच्या हिरड्या काळ्या असतात, त्यांच्यासाठी हे देखील अशुभ लक्षण आहे.

Read Also : चित्रातील घोडा फक्त बिरबलाचा मेंदू असणारेच शकतील शोधू 

स्त्रीच्या तळहातावर असे चिन्ह असावे, जे मांसाहारी पक्षी किंवा कावळा, घुबड, साप, लांडगा, सारखे दिसत असेल अशा महिला इतरांच्या दुःखाचे कारण बनतात.  ज्या महिलांच्या हातातील शिरा त्यांच्या तळहाताच्या आकारात किंवा सपाट तळहाताच्या आकारात फरक असतो, अशा महिला आयुष्यभर सुख आणि संपत्तीपासून वंचित राहतात. ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि भितीदायक असतात, त्या स्त्रीचा स्वभाव चांगला नसतो.  चाणक्य नीतीमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ज्या महिलांची मान लहान असते, अशा महिला कोणत्याही सिद्धीसाठी इतरांवर अवलंबून असतात. मानेची लांबी चार बोटांपेक्षा जास्त असते, ती स्त्री स्वतःच्या वंशाच्या नाशाचे कारण बनत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी